परळी वैजनाथ - बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत आहे.परळीत कोरोनाचा आकडा 200 वर पोचला आहे,कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढलेल्या भागाला कंटेनमेंट झोन केले गेले आहेत.या कंटेनमेंट झोन मध्ये राहणाऱ्या नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासाठी प्रशासनाने शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश काढलेले असताना परळीत काही भागात या आदेशांचे पालन होताना दिसत नाही.याचाच परिणाम शहरातील पत्रकाराने आपला जीव धोक्यात घालून कंटेनमेंट झोन मध्ये असलेल्या नागरिकाला औषधी घरपोच दिल्या आहेत.
सध्या परळी शहरातील माणिक नगर भागात कंटेनमेंट झोन लागू केलेला आहे. या भागात राहणाऱ्या एका नागरिकाला औषधांची आवश्यकता होती मात्र त्याला बाहेर येता न आल्याने त्याने थेट पत्रकार महादेव शिंदे यांना फोन करून कैफियत मांडत औषधे आणून देण्याची विनंती केली कुठलाही तमा न बाळगता महादेव शिंदे यांनी त्या नागरिकाला औषधं देत माणुसकीचे दर्शन घडविले.अशी परिस्थिती कंटेनमेंट झोन असलेल्या नागरिकांवर ओढावत आहे.
कंटेंनमेंट झोन मध्ये राहत असलेल्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे मात्र या शिक्षकांबद्दल त्या भागातील नागरिकांना कुठलीच माहिती नसल्याने या नागरिकांवर संकट ओढवण्याची शक्यता आहे.कंटेनमेंट झोन असलेल्या भागात नेमणूक केलेल्या शिक्षकांचे नाव आणि मोबाईल नंबर प्रशासनाने दर्शनी भागात लावणे गरजेचे झाले आहे यामुळे त्या भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी त्यांच्याशी संपर्क करणे सोपे जाईल याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची चर्चा नागरिकातून होत आहे.
COMMENTS