मुखेड च्या आरोग्य विभागाचा कारभार रामभरोसे


नांदेड  (विठ्ठल कल्याणपाड )


------------------------


 


"मुखेड क्वारंनटाईन सेंटर मधुन रिपोर्ट येण्या एक दिवस अगोदर रूग्णाला सोडले घरी ....नंतर सदरील रूग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह्..."


 


-----------------------


 


  नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील आंबुलगा (बु) येथिल एका महिलेचा रिपोर्ट येण्याअगोदर कोरोना क्वारंनटाईन सेंटर मधुन सोडले घरी... सदरील महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह् आल्या नंतर उडाली आरोग्य विभाची झोप..दि.२५ रोजी आंबुलगा येथिल पॉझिटिव्ह् व्यक्तिच्या संपर्कातील ७ जणांचे स्वाॕब मुखेड येथिल कोरोना क्वारंनटाईन सेंटर मधुन पाठविण्यात आले होते. दि. २६ रोजी त्यातिल ५ जणांचे निगेटिव्ह तर २ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह् आलेली आहेत..दोन पॉझिटिव्ह् पैकी एकाचा रिपोर्ट येण्याअगोदरच क्वारंनटाईन सेंटर मधुन घरी सोडण्यात आले त्या मुळे आरोग्य विभागाच्या अशा भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील कोरोनाची संख्या वाढत आहे ही काय ? अशी चर्चा तालुक्यातील नागरीकात चालु आहे..अशा आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे नागरीकात भितिचे वातावरण निर्माण झाले आहे....


 


-----------------------------


कोरोना पॉझिटिव्ह् रूग्णाच्या संपर्कात असलेल्यांना क्वारंनटाईन केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट येईपर्यंत त्यांना घरी सोडता येत नाही...त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर हि घरि १४ दिवस क्वारंनटाईन राहण्यासाठी सांगितले जाते.....


  


  डॉ.धनगे साहेब 


प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी राजुरा (बु) 


-------------------------------


 


सदरील पॉझिटिव्ह् रिपोर्ट आलेली महिला रिपोर्ट येण्याअगोदर क्वारंनटाईन सेंटर मधुन कुणालाही न सांगता घरी गेली आहे...आम्ही लवकरात लवकर कोरोना पॉझिटिव्ह् महिलेला कोरोना सेंटर मध्ये अॕडमिट करूण घेवू ...


 


     डॉ. रमेश गवाले 


( तालुका आरोग्य अधिकारी मुखेड )


-----------------------------


टिप्पण्या