*जिल्ह्यात कोरोनाचा पाऊस !* *-शहरी भागासह तालुक्यालाही कोरोनाची मगरमिठी.*

 


*-चोवीस तासात 83 बाधित; तर 2 जणांचा मृत्यू.*


*-रुग्णसंख्या पोहचली 1252 वर.*



 


नांदेड. प्रतिनिधी 


जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबता थांबेना.कोरोनाने शहर-गाव, वाडी-वस्ती, लहान-मोठा असा भेदभाव न करता जवळपास सर्वच वयोगटातील नागरिकांना आपल्या चक्रव्यूहात सामावून घेतले आहे. 25 जूनला बाधित रुग्णांची संख्या 331 होती व मृत्यूची संख्या 14 होती, आज ती 25 जुलैला म्हणजेच महिनाभरात 1252 व मृत्यूची संख्या 56 झाल्याने त्यामद्धे महिन्याभरात 921 इतकी प्रचंड वाढ व 42 रुग्ण दगावले आहेत.एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शहरापुरता चर्चेचा विषय असलेला कोरोना आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दहशत माजवू लागला आहे. आजमितीस सर्वच तालुक्यात त्याचा मुक्काम असून तो आता आणखी किती दिवस मुक्कामाला आहे, हे सर्व नांदेडकरांवरचं अवलंबून आहे.


 


 


      नांदेडमद्धे आज कोरोना रुग्णांचा मुसळधार पाऊस झाला असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू आकडा देखील चिंताजनक बाब ठरत आहे. मागच्या 24 तासांमध्ये तब्बल 83 रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजमितीस एकूण रुग्णसंख्या 1252 वर पोहचली आहे. आज 19 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.दोघांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 56 एवढी झाली आहे.


 


      आज प्राप्त झालेल्या 445 नमुने तपासणी अहवालापैकी पैकी 327 नमूने निगेटीव्ह आले आहेत व 83 नमून्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 1252 झाली आहे. आजवर डिस्चार्ज झालेले रुग्ण 672 असून उपचार घेत असलेले रुग्ण हे 513 आहेत. प्रलंबित असलेल्या स्वॅबची संख्या 270 एवढी आहे.  


 


      दरम्यान कोरोनाच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शहरात कडक संचारबंदी लावली होती. मात्र, कालपासून संचारबंदी शिथिल होताच शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठी वर्दळ दिसून येत आहे. दुकानांमध्येही फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लोकांनी मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी न केल्यामुळेच कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. एकीकडे 'कोरोनामुक्त'ची संख्या आशायादी असली तरी मृत्यूचा दर मात्र धोकादायक आहे.कोरोना महामारीचे संकट जिल्ह्यात आणखी किती मोठे 'तांडव' करणार आहे, याची भीती आता प्रत्येकाला लागून राहिली आहे. सायंकाळी सहा वाजल्यानंतर शहरे आणि तालुके सामसूम होत आहेत.


 


टिप्पण्या