माजलगाव (प्रतिनिधी)
शहरातील व ग्रामीण भागातील महावितरण कंपनीच्या वीज ग्राहकांना विद्युत विभागाने लाॅकडाऊन च्या कालावधीमध्ये मिटर रिंडिग न घेताच अवाजवी वीज बील आकारणी केली आहे. या संदर्भात सोमवार दि.20 जुलै 2020 रोजी सकाळी 11 वाजता महावितरण कंपनीच्या पावर हाऊस रोड माजलगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर वाढीव वीज बिलाची होळी करून राज्य शासनाला जागे करण्यासाठी हालगी बजाओ आदोंलन भाजपा च्या प्रदेश उपाध्यक्षा खासदार डॉ.प्रितमताई मुंडे, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य रमेशराव आडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले असल्याची माहिती भाजप तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांनी दिली आहे.
या विषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, लॉक डाऊन काळातील वीज बिले माफ करू असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते.मात्र लबाडाचे आवतन जेवल्याशिवय खरे नाही.याचा प्रत्यय शेतकरी व नागरिकांना आला आहे.वीज बिले माफ तर झाली नाहीत.उलट मिटर रीडिंग न घेता अवाजवी बिले ग्राहकांच्या माथी मारणे सुरु आहे.याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज भाजपच्या वतीने येथील वीज कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून निद्रिस्त सरकारला जाग करण्यासाठी हलगी बजाओ आंदोलन करण्यात येणार आहे.यावेळी जिल्हाधिकारी बीड यांनी नमुद केलेल्या कोरोना संसर्ग विषयक नियमावलीचे पालन करून सोशयल डिस्टंन्सींग चे पालन करत आंदोलन पार पाडायचे आहे.या वेळी भाजपच्या सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य ,भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी, नगरपालिकेचे नगरसेवक व शक्ती प्रमुख, बुत प्रमुख सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन
अरुण राऊत भाजपा तालुका अध्यक्ष माजलगाव यांनी केले आहे.
COMMENTS