जिल्हयातील सर्वत्र कोरोनाचा प्रदुर्भांव पसरला असुन. ही साथ रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू असले तरी रुग्णाच्या संख्येत काही कमी होत नसल्याचे दिसुन येत आहे. दि. १६ जुलै रोजी ४६२ स्वॉव तपासले असता 3८८ अहवाल निगेटिव्ह आले तर ६४ जनांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील तपासण्यात आलेल्या ४६२ स्वॉब पैकी ६४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यात लातुर- १३, उदगीर- १२, अहमदपूर- ३ , औसा- ६, देवणी- ३, निलंगा- १२, सीआरपी कँप- ७, चाकुर- ८, आशी संख्या आहे. लातुर येथील सराफ लाईन ६३ वर्षीय व आशोक नगर उदगीर येथील ५३ वर्षीय दोन पुरुषांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत ९७३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असुन उपचारानंतर ४७१ जन बरे होवुन घरी गेले आहेत. सध्या ४५२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ४५ रुग्ण दगावले आहेत. दरम्यान आज मिळालेल्या माहितीनुसार दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही साथ झपाट्याने वाढत असुन लॉकडाउन कडकडीत सुरू आहे. उदगीर तालुक्यात आजपर्यंत २०७ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर १२८ रग्ण बरे झाले आहेत तर उपचारादरम्यान १५ जन दगावले आहेत. संध्या उदगीर येथील कोविट रुग्णालयात ३९ तर तोंडार पाटी येथील कोरोना सेंटर येथे १८ असे एकुण ५७ रुग्ण उपचार घेत आहे
COMMENTS