मोटार सायकल सह पुरात वाहुन गेलेल्या कृष्षा घोरड व मुलांचा मृतदेह सापडला 


 मादळमोही दि,२५ (संतोष भारती):-- गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथुन परवा पुराच्या पाण्यात मोटारसायकल सह वाहुन गेलेल्या कृष्णा घोरड व त्याचा मुलगा यांचा मृतदेह खळेगांव बांधारात बचाव पथकाने शोध घेत ते मृतदेह बंधारातुन बाहेर काढले, काल मुलीचा मृतदेह काढण्यात बचाव पथकाल यश आले होते, संबधित इसम हा सासरवाडी वरुन बालमटाकळी स्वतः च्या गांवी परवा जात आसताना नदीला मोठा पुर येवुन पुलावरुन मोटारसायकल सह वाहुन गेला होता, काल बचाव पथकाने शोध घेतला आसता मुलीचा मृतदेह सापडला होता,बचाव पथकाने मोठे शर्यतचे प्रयत्न करत दोंघाचे मृतदेह पाण्यातुन शोधुन काढले,पंचमीच्या पुर्व संध्याला ही घटना घडल्याने नगर जिल्हातील बालमटाकळी गांवावर शोककळा पसरली,


        या बाबत वृत असे की, गेवराई तालुक्यातील देवप्रिंरी येथे सासरवाडीला कृष्णा घोरड हा इसम दोन मुलासह आला होता परावा सध्यांकाळी गावी परतत आसतान जोराचा पाऊस आला, पाऊस उघडल्या नंतर पुढे जाण्यासाठी निघाला आसता पौळाचीवाडी पुलावरुन पुराचे पाणी वाहत होते रात्रीच्या वेळी वाहत्या पाण्याचा आंदाज न आल्याने मोटारसायकल व दोन मुलासह वाहून गेला,दुसर्या दिवशी शोधाशोध केली आसता व मोबाईल फोन न लागल्याने नदीपात्रात बचाव पथकासह पोलिस व महसुल प्रशासन शोधाशोध केली आसता परवा मुलीचा मृतदेह सापडला होता तर आज बचाव पथकाने दोंघाचा मृतदेह बाहेर काढले, पंचमीच्या पुर्वसंध्याला ही घटना घडल्याने बालमटाकळी गांवावर शोककळा पसरली आहे


टिप्पण्या