*पहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमातील 25 टक्के भाग कमी* --- *नांदेडभूषण प्रा. नितीन दारमोड यांच्या मागणीला यश...* धर्माबाद (अहमद ...
*पहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमातील 25 टक्के भाग कमी* ---
*नांदेडभूषण प्रा. नितीन दारमोड यांच्या मागणीला यश...*
धर्माबाद (अहमद लड्डा) : कोरोना संकटाच्या काळात शाळा बंद असताना विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विचार करून अभ्यासक्रमातील 25 ते 30 टक्के भाग कमी करण्यात यावा अशी मागणी नांदेडभूषण प्रा. नितीन दारमोड यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांच्याकडे केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी पहिली ते बारावी पर्यंतचे 25 टक्के अभ्यासक्रम कमी केल्याचे जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता आणि कोविड 19 मुळे टाळेबंदी लक्षात घेऊन सदरील मागणी प्रा. दारमोड यांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश आल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांचे आभार मानले आहेत.
COMMENTS