धर्माबाद (अहमद लड्डा) गेल्या चार दिवसांपूर्वी शांत असलेल्या धर्माबाद शहरात पुन्हा एकदा कोरोणा संक्रमणाने तोंड वर काढले असून शहरातील सहा रुग्ण पुन्हा बाधित झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
कमालीची बाब म्हणजे धर्माबाद तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये एकही रुग्ण आढळला नाही, परंतु धर्माबाद शहरामध्ये तहसीलदार, नगर प्रशासन , वैद्यकीय विभाग एवढे सतर्क असून सुद्धा शहरांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे यावर नवल व्यक्त केल्या जात आहे.
शहरातील नागरिकांना वारंवार सांगून सुद्धा त्यांच्याकडून सोशल डिस्टंसिंग चे पालन होत नसल्याचा प्रकार धर्माबाद मध्ये समोर येत आहे.
सज्ञान आणि सुजाण असलेल्या नागरिकांमध्ये जागृतीसाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले असतानासुद्धा ग्रामीण भागातील लोक जागरुक झाले आहेत पण शहरातील लोकांना कोरोना विषयी जागृता नसल्याचे चित्र सध्या धर्माबाद शहरात दिसत आहे.
अनावश्यकपणे फिरणाऱ्या ची संख्या रस्त्यावर जास्त झाली असून जिल्हाधिकाऱ्यांनी लाॅक डाऊन बंदी उठवली ते निश्चितच धर्माबादकरांच्या पचनी पडली नाही असेच म्हणावे लागेल.
यामध्ये भर म्हणून की काय धर्माबाद शहरांमध्ये मुक्तपणे फिल्टर पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकां च्या माध्यमातून जो पाणी फिल्टर पुरवठा शहराला केल्या जातो त्या पुरवठा करणाऱ्या तरुणांची सुद्धा covid-19 ची मागणी शिवराज पाटील गाडीवान यांनी तहसीलदार दत्तात्रय शिंदे पोलीस निरीक्षक सोहन माछरे व उपजिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र शेळके यांच्याकडे नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
बसव ब्रिगेडच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनामध्ये शिवराज पा गाडीवान यांनी मागणी केली आहे की शहरांमध्ये गल्ली बोळिमध्ये फिल्टर पाण्याचे अॅटोने शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो या पाणीपुरवठा च्या माध्यमातून संक्रमणाचा धोका वाढत शकतो
त्या पुरवठादार सुदृढ तरुणांनी पुढाकाराने टेस्ट करून घ्यावी स्वतःसाठी व शहरवासीयांच्या आरोग्यासाठी सुद्धा हे हिताचे असून यासाठी फिल्टर मालकांनी पुढाकार घ्यावा
व नगर प्रशासनाने त्यांना अधिकृत असे ओळखपत्र त्यांच्याकडे दिल्यानंतरच नगरवासीयांनी पाणी घ्यावे असे आवहान शिवराज पाटील गाडीवान यांनी नगर पालिकेला दिलेल्या निवेदनात केले आहे.
दिलेल्या निवेदनाची नगर प्रशासन तालुका प्रशासन काय दखल घेते हे बघणे उत्सुकतेचे आहे.
COMMENTS