धर्माबाद (अहमद लड्डा) कोरोना साथीच्या आजारामुळे जगभरात दयनीय अवस्था झाली आहे. कोरोना चा उपचार नसल्या कारणाने सरकारला लॉकडाउन करावे लागले. अशा परिस्थितीत, जिल्यातील कांही इंग्रजी शाळेतील शिक्षकांच्या जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्याचे काही दिवसाचं पगार यायचे असल्या कारणाने, त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांवर बिकट वेळ आली आहे. नांदेड जिल्ह्यातील इंग्रजी शाळेतील शिक्षकांना जानेवारी व फेब्रुवारीचे आणि मार्च महिन्याचे कांही दिवसांचे पगार मिळायचे आहे. ह्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष श्री दत्तात्रय कावडे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक ई-मेल पाठवून या शिक्षकांच्या वेतनाबाबत संस्था चालकांना सूचना देण्याची विनंती केली आहे. सरकारच्या वतीने या शिक्षकांना अन्नाची किट वाटप करण्यात यावी, असेही श्री.कावडे यांनी म्हटले आहे. सध्या या शिक्षकांचे वाईट दिवस चालले आहेत. कारण त्यांचे ट्युशन देखील बंद आहे. काही शिक्षक शेतात कामाला जात आहेत तर काही मेकॅनिक म्हणून काम करत आहेत. काही शिक्षक कामासाठी नांदेड आणि निजामाबाद येथे गेले आहेत आणि त्यांना जे काम मिळेल ते करून आपली व आपल्या कुटुंबातील व्यक्तीची उपजीविका भागवत आहेत. जिल्ह्यातील उमरी, लोहा, भोकर, हिमायतनगर, किनवट, माहूर, धर्माबाद, हदगाव , कंधार ,नायगाव आणि मुखेड सहित जिल्ह्यातील आणखी कांही तालुक्यातील इंग्रजी शाळांमध्ये शिक्षकांना अडीच महिन्याचे पगार मिळालेच नाही असे समजले आहे, ह्या करीता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष श्री दत्तात्रय कावडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे ह्यांना ह्या विषयी लक्ष घालण्याची आग्रहाची विंनती केली आहे. जर संस्थाचालक ह्या शिक्षकांना त्वरित पगार न दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईल मध्ये आंदोलन करेल, असेही श्री कावडे यांनी सांगितले.
COMMENTS