- धर्माबादेत कोरोना रुग्ण आढळले
धर्माबाद( अहमद लड्डा ) येथील पोलिस उपनिरीक्षक यांच्या संपर्कात आल्यामुळे सोमवारी शहरातील 25 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यापैकी 22 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आला असून तीन जण कोरोना पाझिटिव्ह रूग्ण असल्याचे आढळून आले आहे.तसेच शहरातील हनुमान मंदीर परीसरातील एका हाॅटेल चालकाचे कोरोना रिपोर्ट पाझिटिव्ह आला असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शेख एकबाल यांनी सांगितले आहे. एकूण चार रुग्ण आणखी धर्माबादेत आढळून आल्यामुळे शहरातील जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धर्माबाद येथील पोलिस उपनिरीक्षक कुंडलवाडी येथील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाचे रिपोर्ट पाझिटिव्ह आले आहे.व त्यांच्या परीवारातील सासूबाई व मुलासही कोरोनाची लागण झाली आहे. अशी चर्चा आजपर्यंत झाली आहे. परंतु सदरील पोलिस उपनिरीक्षकाची सासूबाई उदगीर येथून दि.1 जुलै रोजी धर्माबाद येथे आली असल्याचे पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांनी सांगितले आहे. पोलिस उपनिरीक्षक कुंडलवाडी येथील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्यामुळे कुंडलवाडी येथील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याची चर्चा शहरातील जनतेतून होत आहे.शहरातील पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी,डाॅक्टर यांच्यासह 25 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.त्यापैकी 22 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.व तीन जणांचा कोरोना रिपोर्ट पाझिटिव्ह आल्यामुळे शहरातील जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच शहरातील हनुमान मंदीर परीसरातील हाॅटेल चालकाची तब्बीयत बिघडल्यामुळे पुढील उपचारासाठी नांदेडला नेण्यात आले होते.त्यांचा कोरोना रिपोर्ट पाझिटिव्ह आला आहे.त्यामुळे मंगळवारी एकूण 4 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे.त्यामुळे तालुक्यात आतापर्यंत एकूण 9 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे.मंगळवारी आलेल्या कोरोना रिपोर्ट मध्ये शहरातील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय,शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, शहरातील बालरोग तज्ञ व हाॅटेल चालकाचा समावेश आहे.व मंगळवारी आणखी सहा जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शेख एकबाल यांनी सांगितले आहे. माहेश्वरी भवन मध्ये असलेल्या कोविड केअर सेंटरला उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके यांनी भेट देऊन विविध उपाययोजना राबविण्याच्या सुचना दिल्या आहे.यावेळी तहसिलदार शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शेख एकबाल, पोलिस निरीक्षक सोहन माछरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मीनारायण केशटवार, डॉ.कु.पूजा आरटवाड, नगरपरीषदेचे कार्यालयीन अधीक्षक बाबूराव केंद्रे,रूक्माजी भोगावार,मंडळ अधिकारी नामदेव माळोदे,तलाठी सहदेव बासरे उपस्थित होते.
COMMENTS