नांदेड जिल्ह्यात ३२ करोना बाधितांची भर; ४० व्यक्ती बरे तर दोघांचा मृत्यू


 


नांदेड :- जिल्ह्यात २१ जुलै रोजीच्या अहवालानुसार ३२ व्यक्ती बाधित झाले. तर ४० व्यक्ती आज बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. कालच्या एकूण १३४ अहवालापैकी ९८ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता १ हजार १८ एवढी झाली असून यातील ५५५ एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. ४११ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील ३४ बाधितांची संख्या गंभीर स्वरुपाची आहे. यात १७ महिला व १७ पुरुषांचा समावेश आहे.


 


सोमवारी आंबेडकरनगर येथील २७ वर्षाचा एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय नांदेड येथे उपचार सुरु असतांना तर मंगळवारी रहेमतनगर येथील ६९ वर्षाचा एका पुरुषाचा खाजगी रुग्णालय येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या ४४ एवढी झाली आहे.


 


काल बरे झालेल्या ४० बाधितांमध्ये मुखेड कोविड केअर सेंटर येथील १, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील १, बिलोली कोविड रुग्णालयातील ३, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील ८, हदगाव कोविड केअर सेंटर येथील १, मुदखेड कोविड केअर सेंटर येथील ५, देगलूर कोविड केअर सेंटर येथील ५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील २ तसेच खाजगी रुग्णालयातील १४ बाधितांचा यात समावेश आहे. आतापर्यंत एकुण ५५५ बाधित व्यक्तींना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे.


 


आरटीपीसीआर तपसणी प्रक्रियेद्वारे नवीन बाधितांमध्ये वजिराबाद नांदेड येथील ४९ वर्षाची १ महिला, काबरानगर नांदेड येथील ७२ वर्षाचा एक पुरुष व ७१ वर्षाची १ महिला, फत्तेबुरुज किल्ला रोड येथील ६५ वर्षाचा १ पुरुष, आनंदनगर नांदेड येथील ४५ व ८० वर्षाचे २ पुरुष, सोमेश कॉलनी येथील ९५ वर्षाची १ महिला, निजाम कॉलनी नांदेड येथील ५० वर्षाचा १ पुरुष, वाडी नांदेड येथील २७ वर्षाची १ महिला, शिवाजीनगर नांदेड येथील ७१ वर्षाची १ महिला, स्त्री रुग्णालय नांदेड येथील २९ वर्षाचा १ पुरुष, बिलोली तालुक्यातील कासराळी येथील ५५ वर्षाची १ महिला, मुखेड तालुक्यातील रावी येथील ३५ वर्षाचा १ पुरुष, मुखेड तालुक्यातील खैरका येथील ३० वर्षाची १ महिला, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील ४० वर्षाचा १ पुरुष, नायगाव तालुक्यातील कुटूंर येथील ३९ वर्षाचा १ पुरुष, देगलूर तालुक्यातील सीईओ निवासस्थान परिसर ४४ वर्षाचा १ पुरुष, देगलूर लाईन गल्ली येथील १३,१३, २०, २०, 48 वर्षाचे ५ पुरुष, देगलूर मरखेल पोलीस स्टेशन येथील ३२ वर्षाचा १ पुरुष, देगलूर तालुक्यातील भायेगाव रोड येथील २१ वर्षाची १ महिला, देगलूर नोगाबा मंदिर येथील १५ वर्षाचा १ पुरुष, देगलूर तालुक्यातील शेलगाव येथील २३ वर्षाचा १ पुरुष, देगलूर तालुक्यातील कोत्तेकल्लुर ५, १०, ४८ वर्षाचे ३ पुरुष, देगलूर तालुक्यातील भुतन हिप्परगा येथील ३५ वर्षाचा १ पुरुष व परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील ५४ वर्षाचा १ पुरुष आणि हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील ५५ वर्षाचा १ पुरुषांचा यात समावेश आहे.


 



  • जिल्ह्यात ४११ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ८७, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे १४१, नायगाव कोविड केअर सेंटर येथे १३, जिल्हा रुग्णालय येथे २८, बिलोली कोविड केअर सेंटर येथे १०, मुखेड कोविड केअर सेंटर येथे ४१, देगलूर कोविड केअर सेंटर येथे २३, माहूर कोविड केअर सेंटर १, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे ३, लोहा कोविड केअर सेंटर येथे १२, कंधार कोविड केअर सेंटर येथे २, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे ३, खाजगी रुग्णालयात ३९ बाधित व्यक्ती उपचार घेत असून ६ बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे १ बाधित तर मुंबई येथे १ बाधित संदर्भित झाले आहेत.


 


 


प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.


टिप्पण्या