- *नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गावे समाविष्ट करण्याची मागणी*
- *रामेश्वर मोकाशे यांची निवेदनाद्वारे कृषिमंत्री यांच्याकडे मागणी*
- सोनपेठ/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागात शेती व आधारित व्यवसायावर मोठ्या प्रमाणात विकासनिधी खर्च करण्याचे धोरण अवलंबिले आहे.मात्र हा विकास करीत असताना काही योजनेतून अधिकाऱ्यांच्या नियोजनामुळे आणि स्थानिक नेत्यांच्या दुर्लक्षामुळे काही गावे वगळली असल्याचा प्रकार झाला आहे.यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना हे उदाहरण ताजे असून शेती व्यवसायासोबतच शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी करण्यात येणाऱ्या नियोजनातुन ही गावे वगळली असल्याचा आरोप युवासेनेचे सोनपेठ तालुकाप्रमुख रामेश्वर मोकाशे यांनी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे एका निवेदनातुन केला आहे.यासोबतच त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत कान्हेंगाव,शिर्शी(बु.),शिरोरी या तीन गावांचा समावेश करण्याची मागणीही केली आहे.या निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे की,वरील गावे विकासापासून कोसो दूर असून या गावांचा विकास साधण्यासाठी येथील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे.ही आर्थिक उन्नती करत असताना शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणींना तोंड देत असतो.यात या शेतकर्यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यापेक्षा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही शेतकऱ्यांना बळकट करण्यासाठी आहे.त्यामुळे वरील गावाचा समावेश केल्यास शेतकऱ्यांचे हात बळकट होतील व आर्थिक उन्नती होण्यासाठी मदत होईल पाणी असूनही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत या पाण्याचा उपयोग करता येत नाही त्याचे कारण म्हणजे त्यांच्या नशिबी येणारी आर्थिक अडचण हीच सर्वात मोठी विवंचना शेतकऱ्यांच्या नशिबी आहे.सदर गावाचा या योजनेत समावेश केल्यास वरील अडचण दूर होऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल अशी खात्रीही मोकाशे यांनी व्यक्त केली आहे.
COMMENTS