पुर्णा प्रतिनिधी
पुर्णा तहसिलदारांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवले निवेदन पूर्णा:(संतोष पुरी पूर्णा) - कोवीड -19 ची महामारी सर्वच चालू आहे.परंतु कोरोना हॉस्पिटल मध्ये पेशंट चा विलाज करीत असताना काही जन बरे होत आहेत परंतु काही जन एक दोन दिवसा मध्ये मृत्यु पावत आहे. या मुळे नागरिका मध्ये भयभती चे वातावरण निर्माण झाले आहे की डॉक्टर लोक हे पेशंट ला चुकीचे इंजेक्शन देत असल्या बाबत शंका निर्माण होत आहे. यामुळे नागरिक हे तब्यत खराब असून सुद्धा दवाखान्या मध्ये भितीमुळे जाण्यास धजावत आहेत. कारण दवाखान्याची छबी खराब होत आहे. ज्या वार्डा मध्ये कोवीड -19 चा विलाज चालू आहे आशा ठिकाणी सी. सी. टी. व्ही. कैमेरे बसविण्यात यावे. व त्याची छबी मॉनिटर वर (डिस्पिलेवर ) बाहेर इतर नागरिकांना लाइव पाहण्यांसाठी दवाखान्यात ठेवण्यात यावे. त्त्यामुळे नागरिकांचा मनातील भिती व शंका निघून जाईल व जे लोक तब्यत खराब असून सुद्धा घरात आहे ते लोक सुद्धा हॉस्पिटल मध्ये अड्मिट होतील. यामुळे कोरोना जास्त पसरणार नाही असेही निवेदनात म्हटले असून निवेदनात असे नमूद केले आहे की राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याकडे जातीने लक्ष देऊन पूर्ण महाराष्ट्रात जेथे जेथे सिसीटीव्ही. कैमेरे दवाखान्यात नाहीत तेथे तेथे लवकरात लवकर बसविण्या करीता आदेशीत करावे. यामुळे कोवीड -19 चा विलाज असलेल्या ठिकाणी सिसीटी.व्ही. कैमेरे बसवून नागरिकांना भिती व शंका पासून दूर करावे अशी विनंतीही निवेदना द्वारे मुख्यमंत्र्यांना करण्यात आली असून या निवेदनावर शेख इरफान शेख बाबू ,शेख फैसल शेख अबजल,मो शफीक मो रफीक,अब्दुल निसार अब्दुल सत्तार आदींच्या स्वाक्षरी आहेत....
COMMENTS