पंकजा मुंडे यांच्या वाढदिवासा निमित्त मास्क, सॅनिटायझर चे वाटप


 


माजलगाव/प्रतिनिधी 


तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री तथा लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते रमेशराव आडसकर यांच्या हास्ते आज दि. 26 जुलै रोजी दुपारी माजलगाव शहर पोलीस व ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आरोग्यच्या सुरक्षतेसाठी मास्क व सॅनीटायझर वाटप करण्यात आले आहे. 


     गेली 5 ते 6 महिन्यापासून पोलीस अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरून नागरिकांना वेळोवेळी तोंडाला मास्क लावा रस्त्यावर गर्दी करू नका गर्दीत जाऊन नका जीव धोक्यात टाकून सूचना देत आहेत. म्हणून माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त भाजपचे नेते रमेश आडसकर यांनी मास्क व सॅनिटायझर चे वाटप केले आहे. यावेळी भाजपा तालुकाअध्यक्ष अरुण राऊत,ज्ञानेश्वर मेडंके,बबनराव सोळंके,माजी नगरध्यक्ष डॉ अशोकराव तिडके ,प्रशांत पाटील ,नगरसेवक दिपक मेडंके,नगरसेवक विनायक रत्नपारखी,शहराध्यक्ष अॕड सुरेश दळवे,ईश्वर खुर्पे, मनोज फरके,विजय रांजवण,अजय शिंदे,कल्याण शेप,अर्जून पायघन,राम शिंदे,शुभम भुरकवडे,रमेश काठुळे व सर्व कार्यक्रते पद्धधिकारी उपस्थित होते ....


टिप्पण्या