भंते कश्यप महाथेरो यांचे धम्मकार्य महान ......! भंते डॉक्टर उपगुप्त महाथेरो


पूर्णा (संतोष पुरी) 26 बुद्ध विहार पूर्णा याठिकाणी नुकतेच काही दिवसांपूर्वी निधन झाले ले ज्येष्ठ व वयोवृद्ध भंते कश्यप महाथेरो जेतवन बुद्ध विहार हिंगोली यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


भंते डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी दिवंगत भंते कश्यप महाथेरो यांच्या जीवन कार्यावर यथोचित प्रकाश टाकताना सांगितले भंते कश्यप महाथेरो यांचे धम्मकार्य महान आहे.


1977 मध्ये त्यांनी उपसंपदा घेऊन भिक्खू जीवनास प्रारंभ केला हिंगोली अंधारवाडी याठिकाणी जेत्वन बुद्धविहाराचे निर्मिती केली यांच्या अथक प्रयत्नातून या विहरास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला गेल्या अठरा वर्षांपासून त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले जाते.


प्रवचन मध्ये डॉक्टर भदंत उप गुप्त महाथेरो यांनी बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये नागवंशीय राज्यांची गौरवशाली परंपरा लाभली आहे.


भंते पाय्यावांश यांनी आपल्या प्रवचनात प्रत्येक मानवाने आपल्यामधील राग लोभ मसल हेवा हे विकार काढून टाकून महामानव तथागत भगवान बुद्ध व परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिकवणूक आचरणात आणून मार्गक्रमण करावे असे सांगितले.


कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष शामराव जोगदंड वारा काळे श्रीकांत हिवाळे ज्येष्ठ पत्रकार विजय बगाटे पीजी रणवीर गौतम वाघमारे रामभाऊ कांबळे त्र्यंबक कांबळे महानंद गायकवाड संभाजी गायकवाड शिवाजी थोरात बौद्धाचार्य त्रंबक कांबळे किशोर ढाकरगे अतुल गवळी निवृत्ती जमदाडे गायकवाड साहेबराव सोनवणे व महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.


टिप्पण्या