- आ. बाळासाहेब आजबे तालुका समित्यांमध्ये निष्ठावंतांना न्याय देणार की बगलबच्च्यांना स्थान देणार ?
दादासाहेब बन आष्टीः
आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होउन दहा महिने होत आले असून सुरुवातीचा काही काळ सत्ता स्थापनेमध्ये, तर त्यानंतरचा काही काळ कोरोना महामारी मध्ये गेल्याने स्थानिक लेव्हलच्या च्या विधानसभा सदस्य निर्देशित समित्या निवड करण्यात आल्या नाहीत. या समितीची निवड होणे गरजेचे असून या निवडीमध्ये कोणाची वर्णी लागणार याविषयी वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत . या मतदारसंघाचे आ. बाळासाहेब आजबे विजय झालेले राजकीय समीकरण बदलले असून आ.बाळासाहेब आजबे यांना गेल्या राजकीय जीवन प्रवासामध्ये 12 वर्षभरापासून निस्वार्थपणे साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांना या स्थानिक तालुका लेवल समित्यांमध्ये स्थान मिळणार कि आत्ताच नवीन आलेल्या बगलबच्च्यांना छान मिळणार याकडे निष्ठावंत कार्यकर्ते पाहत आहेत . आष्टी तालुका संजय गांधी निराधार समितीच्या तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट पंढरीनाथ पारखे यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी आ. बाळासाहेब आजबे यांच्या कट्टर समर्थक कडून होत आहे. ॲडव्होकेट पंढरीनाथ पारखेे हे आमदार बाळासाहेब आजबे यांचे गेल्या पंधरा वर्षांपासून कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. एडवोकेट पारखे यांनी त्यांच्या कार्यामधून आ. आजबे समर्थक यांची विविध प्रकारची कामे केली आहेत . सर्वांना योग्य सल्ला देऊन वेळप्रसंगी अनेक वेळा आजबेे समर्थक कार्यकर्त्यांना विना सत्तेच्या काळात धीर देण्याचे मोठे काम केलेले आहे . ॲडव्होकेट पारखेे यांना तालुक्यातील सर्व समस्येची जाण आहे . या समितीवर योग्य व्यक्ती असून त्यांची आष्टी तालुका संजय गांधी निराधार समितीवर तालुकाध्यक्ष म्हणून निवड व्हावी अशी मागणी आ. बाळासाहेब आजबे यांचे कट्टर समर्थक महादेव अमृते , सुभाष शेठ वाळके ,महादेव महाजन , दादासाहेब बन, युवराज सोले ,संदीप आस्वर भाऊसाहेब घुले , परशुराम मराठे ,भाऊ चौधरी भानुदास बोडखे, अर्जुन काकडे ,बलभीम काळोखे ,तात्यासाहेब सांयबर, बाळासाहेब कोहक, संजय गुंड, चंद्रकांत खलाशे, चंद्रकांत गुंड, दिलीप चव्हाण , हरिभाऊ दहातोंडे, समीर जाठोत यांनी केली आहे .गेल्या बारा वर्षापासून आमदार बाळासाहेब आजबे यांच्याबरोबर निस्वार्थीपणे काम करणारे यांची निवड आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील तालुका समितीवर व्हावी अशी मागणीही आ.आजबे समर्थांकाढून होत आहे . आ.बाळासाहेब आजबे निष्ठावंतांना न्याय देणार कि स्थानिक समित्यांमध्ये बगलबच्च्यांना स्थान देणार ? असा प्रश्नही आ. आजबे समर्थाकडून ऐकू येत आहे .
COMMENTS