- सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन कर्मचारी सेवानिवृत्त,
माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर तोटलोड यांनी केला सत्कार
सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय धर्माबाद येथील दोन कर्मचारी आज काल 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले असून त्यांना माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर तोटलोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दिलीप मनुरकर, पत्रकार सतिष पाटील शिंदे,श्रीकांत आदमवाड आदींच्या उपस्थितीत त्यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
धर्माबाद येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयात सेवक म्हणून श्री जी व्ही अकलोड यांनी 38 वर्ष सेवापूर्ण केली तर नारायण लिंगणा पुलकंठवार यांनी मार्ग लिपिक म्हणून आपला सेवाकाळ पूर्ण केला.विशेष म्हणजे दोघेही तालुक्यातील आतकुर या गावचे भूमिपुत्र आहेत.
या सेवानिवृत्त निमित्ताने सत्कार सोहळ्यास ,साईनाथ जगडमवार,गजानन सांगेवार, सतिष रेडी, चक्रम अकलोड,योगेश हिंगेवार आणि अजय गटूवार आदीजन उपस्थित होते.
-ग्लोबल मराठवाडा न्यूजसाठी - अहमद लड्डा, धर्माबाद.
COMMENTS