जळगाव >> शहरातील एका तरुणीचा लाकडी दरवाजाच्या फटीतून अंघोळ केल्यानंतर कपडे बदलतानाचा व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाची शनिवारी कारागृहात रव...
जळगाव >>
शहरातील एका तरुणीचा लाकडी दरवाजाच्या फटीतून अंघोळ केल्यानंतर कपडे बदलतानाचा व्हिडीओ शूट करणाऱ्या तरुणाची शनिवारी कारागृहात रवानगी केली.
बांधकाम कामगार असलेला आतिफ याकुब बेग वय २०, रा. पिंप्राळा-हुडको, आझादनगर याने एका तरुणीचे आक्षेपार्य व्हिडीओ शुटींग मोबाईल मध्ये तयार केले होते. यानंतर त्याने १७ जुलै रोजी याच तरुणीस तिचे व्हिडीओ असलेले मेमरीकार्ड देण्याचा प्रयत्न केला. यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानुसार १७ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आतिफ याला अटक केली होती. त्याच्याकडून संबधित मेमरीकार्ड जप्त करण्यात आले आहे
COMMENTS