नांदेड :- जिल्ह्यात शुक्रवारी १७ जुलै रोजीच्या अहवालानुसार ३० बाधित बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर नवीन ३२ बाधित व्यक्तींची भर पडली असून परभणी जिल्ह्यातील जिंतूर कावी येथील ७० वर्षाचा पुरुष व हिंगोली जिल्ह्यातील ६६ वर्षाचा एक पुरुष, कंधार तालुक्यातील फुलवळ येथील ६४ वर्षाचा एका पुरुषाचा उपचारा दरम्यान शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथे मृत्यू झाला. या बाधितास उच्च रक्तदाब, मधुमेह व श्वसनाचे इत्यादी आजार होते. आजच्या एकूण २५५ अहवालापैकी १८२ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता ७७५ एवढी झाली आहे. यातील ४६९ बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बाधितांची संख्या ४३ एवढी झाली आहे.
शुक्रवारी बरे झालेल्या ३० बाधितांमध्ये पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील २, नायगाव कोविड केअर सेंटर येथील ५, मुखेड कोविड केअर सेंटर येथील १४, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील ८ तसेच संदर्भीत करण्यात आलेला एका बाधिताचा यात समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये खालसा कॉलनी नांदेड येथील ५९ वर्षाचा १ पुरुष, देगलूर नाका येथील ६० वर्षाचा १ पुरुष, प्रकाशनगर नांदेड येथील ३१ वर्षाचा १ पुरुष, प्रेमनगर नांदेड येथील ४९ व ३१ वर्षाचे २ पुरुष, विष्णुनगर नांदेड येथील ३६ वर्षाचा १ पुरुष, दुलेशान रहेमाननगर ताहेर किराणा जवळ नांदेड येथील ३८ वर्षाचा १ पुरुष, पावडेवाडी नाका येथील ३७ वर्षाचा १ पुरुष, कंधार तालुक्यातील फुलवळ येथील १३ वर्षाची १ महिला, कंधार येथील ४३ वर्षाची १ महिला, मुखेड तालुक्यातील काकांडी वाडी येथील ४४ वर्षाचा १ पुरुष, मुखेड येथील ६५ वर्षाची १ महिला, नायगाव तालुक्यातील कुटूंर येथील ५, ८, ८, ३८ वर्षाचे ४ पुरुष तर २५ वर्षाची १ महिला, धर्माबाद पटेलनगर येथील ७४ वर्षाची १ महिला, धर्माबाद गुजराती कॉलनी येथील ४६ वर्षाचा १ पुरुष व ५२ वर्षाची १ महिला, धर्माबाद येथील ४५ वर्षाचा १ पुरुष, बिलोली तालुक्यातील कासराळी येथील ३९ वर्षाचा १ पुरुष, बिलोली तालुक्यातील गुजरी येथील ३२ वर्षाचा १ पुरुष, देगलूर येथील नागोबा मंदिर येथील ६० वर्षाची १ महिला, देगलूर येथील बालाजी झेंडाजवळ येथील ५० वर्षाचा १ पुरुष व ४८ वर्षाची १ महिला, देगलूर तालुक्यातील टाकळी येथील ५५ वर्षाचा १ पुरुष, देगलूर आनंदनगर येथील २८ वर्षाची १ महिला, देगलूर येथील ४७ व ७० वर्षाचे २ पुरुष, हिंगोली तोफखाना रेल्वे स्टेशन रोड येथील ४० वर्षाचा १ पुरुष, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील ५० वर्षाचा १ पुरुष यांचा समावेश आहे.
१७ जुलै रोजी २६४ पॉझिटिव्ह बाधितांवर औषोधोपचार सुरु असून त्यातील २० बाधितांची प्रकृती गंभीर आहे. यात १० महिला बाधित व १० पुरुष बाधित आहेत. आज रोजी ५२३ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळी प्राप्त होतील.
एकुण ७७५ बाधितांपैकी ४३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. ४६९ बाधित हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरीत २६४ बाधितांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ६७, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ६४, नायगाव कोविड केअर सेंटर येथे १४ जिल्हा रुग्णालय येथे ८ बिलोली कोविड केअर सेंटर येथे १२, मुदखेड कोविड केअर सेंटर येथे ५ मुखेड कोविड केअर सेंटर येथे २०, हदगाव कोविड केअर सेंटर येथे १, देगलूर कोविड केअर सेंटर येथे १७, माहूर कोविड केअर सेंटर १, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे २, लोहा कोविड केअर सेंटर येथे १, कंधार कोविड केअर सेंटर येथे २, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे ३ तसेच खाजगी रुग्णालयात ४० बाधित व्यक्ती उपचार घेत असून ६ बाधित औरंगाबाद येथे तर निजामाबाद येथे १ बाधित संदर्भित झाले आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण – १ लाख ४८ हजार १३७
घेतलेले स्वॅब – ९ हजार ५८२
निगेटिव्ह स्वॅब – ७ हजार ६१९
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या – ३२
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती – ७७५
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या – ३०
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या – १०
मृत्यू संख्या – ४३
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या – ४६९
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती – २६४
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या – ५२३
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
COMMENTS