- दोन दिवसात भरवाड कुटुंबियांच्या म्हैसी दगावल्याने लाखो रुपयांचे नुकसान
माजलगाव/प्रतिनिधी
भरवाड कुटुंबिय पोटाची खळगी भरण्यासाठी गुजरात सोडून महाराष्ट्रतील माजलगाव तालुक्यात मुरा गाई, म्हैस घेऊन मागील 15 वर्षा पासून वास्तव्यास आहे त्यांच्या कुटुंबातील दि. 21 जुलै रोजी दुपार पासून संध्याकाळी पर्यंत 10 म्हैसी तर आज दि. 22 जुलै रोजी दुपार पर्यंत 5 म्हशी विषबाधा होऊन जागीच मृत्यु मुखी पडल्याने भरवाड कुटुंबियांचे जवळपास 14 ते 15 लाखांचे नुकसान झाले आहे.
भरवाड कुटुंबियांच्या म्हैसी दगावलेल्याची आज बाजार भावा प्रमाणे एका म्हशींची किंमत अंदाजे 80 ते 90 लाख रु च्या घरात असून तर अंदाजे 14 ते 15 लाख रु. चे नुकसान भरवाड कुटुंब चे झाल्याचे कुटुंब प्रमुख भरवाड यांनी सांगितले.
भरवाड कुटुंब हे मागील 35 वर्षापासून महाराष्ट्रात असून मागील 15 वर्षांपासून ते माजलगाव येथे वास्तव्यास आहेत. पारंपरिक दुधाचा व्यवसाय असल्याने ते माजलगाव तालुक्यात दूध घालून उदरनिर्वाह भागवित आहेत. रोज धरणाच्या कडेला मोकळ्या जागेत या सर्व म्हैसी ना चाऱ्या साठी रोज सोडले जाते. रोजच्या प्रमाणे या म्हैसी चारा खाऊन घरी आल्या त्यानंतर यातील काही म्हैसी च्या तोंडातून फेस येऊन त्या एका जागीच अत्यवस्थ अवस्थेत बसल्या.त्यांनी उपचारास ही दाद दिली नाही त्यात विष बाधा झाल्याने 15 म्हशी दगावल्या आहेत.
COMMENTS