सैनिकी विद्यालयाचा एस.एस.सी. चा निकाल 100 टक्के.


उदगीर,


 


श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी माध्य.व उच्च माध्य. विद्यालयाचा एस.एस.सी.चा निकाल 100 टक्के लागला आहे.


 


मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला .या परीक्षेत सैनिकी विद्यालयाच्या एकूण 78 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.त्यापैकी ५४ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले व २० विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ०४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.


 


विद्यालयातून ओमकार पंडित पवार याने ९७.०० टक्के घेऊन प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.क्षितीज गंगाधर शिंदे ९६.२० टक्के घेऊन द्वितीय,तर आकाश साहेबराव पावडे ९४.४० टक्के घेऊन तृतीय येण्याचा मान पटकावला आहे. ११ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत.


 


सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत उत्तुंग यश संपादन केले आहे .याही वर्षी विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला.उदगीरच्या शैक्षणिक परंपरेत सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.आमच्या विद्यालयाचा इ.१२ वी विज्ञान चा ही निकाल १०० टक्के लागला आहे.


 


या सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे व यांना मार्गदर्शन करणारे सहशिक्षक संतोष चामले, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, विलास शिंदे, धनराज काटू ,नागेश पंगू, बालाजी मुस्कावाड, सतीश जगताप, संजय निरणे, उमाकांत नादरगे,प्रल्हाद येवरीकर, मारोती मारकवाड, विजयकुमार कावळे, सुधीर गायकवाड , ईश्वर अष्टुरे यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष बसवराज म.पाटील नागराळकर , राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य ,उपाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, दिलीप पाटील नागराळकर, चेतन पाटील नागराळकर, कमांडंट कमांडर बी. के .सिंह ,प्राचार्य वसंत कुलकर्णी ,पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के ,सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.


टिप्पण्या