शेतकऱ्यांची जान नसुन ,गाईचे दुध काढण्यासाठी टेबलावर गाय मांडणार असे म्हणार्यांच्या सरकारच्या काळात दुध उत्पादक शेतकरी लागलाय देशोधडीला.
.....................आ.सुरेश धस
.............................................
दादासाहेब बन आष्टी ः
दुध उत्पादक शेतक-यांचे कंबरडे मोडण्याचे काम हे राज्य सरकार करीत असून दुधाचे दर कमी केल्यामुळे शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे.प्रतिलिटर 30 रुपये दर आणि 10 रुपये अनुदान शेतक-यांच्या खात्यावर जमा करावे या मागणीसाठी भाजप व मिञपक्षाच्या वतीने दुधप्रश्नी 1 आॕगष्ट रोजी मतदारसंघात सर्वच ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असून या दिवशी मोफत दुध केंद्र सुरु ठेऊन दुध वाटप करुन सरकारचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती आ.सुरेश धस यांनी दिली.आष्टी येथील निवासस्थानी आयोजीत पञकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना आ.धस म्हणाले की,सद्यस्थितीत दुध उत्पादकांना उत्पादन खर्च देखील निघत नसल्याचे चिञ आहे.उत्पादन खर्च हा 23 ते 24 रुपये इतका आहे.आणि पुढील येणाऱ्या दिवसात दर माञ 16 ते 17 रु.प्रतिलिटर होण्याची शक्यता आहे.त्यामुळे दुध व्यवसायाला वाईट दिवस येतील असे एकंदरीत चिञ आहे.देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना भाजप सरकारने पाच रुपये अनुदान दिले होते.त्या वेळेस याच महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांना दुधाचे काय कळते त्यांना कुठे शेतक-यांचा कळवळा आहे.यांना गायचे दुध काढता येते का,त्यासाठी आम्ही दुध काढण्यासाठी टेबलावर गाय मांडणार यांना शेतकऱ्यांच्या व्यथा काय माहिती आहेत ?असे आरोप भाजपच्या सरकारवर केले होते .आणि आज यांच आरोप करणारे सरकार मध्ये आहेत.यांचे सरकार आहे .जर तुम्हाला शेतकऱ्यांच्या व्यथा,समस्या कळल्या असत्या तर गेल्या पाच महिन्यापासून दुध उत्पादन करीत असलेल्या दुध व्यावसायिक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यावर आपण गप्प का आहात? असे त्यावेळी भाषणे करणाऱ्यांवर प्रतिप्रश्न आ.धस यांनी यावेळी केला.माञ त्याच फडणवीस सरकारने दुधाच्या बाबतीत शेतकरी हिताचे निर्णय घेतले होते.माञ आत्ताचे हे सरकार दुधाच्या प्रश्नावर सपशेल अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे.कोरोनाच्या काळात अस्थिर असलेल्या मुंबईमुळे दुधाचे दर अत्यंत निचांकी आलेले आहेत.त्यामुळे दुध उत्पादक मेटाकुटीला येत आहे.मराठवाड्यात बीड जिल्हा हा परिसर असा आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुध उत्पादक शेतकरी आहेत.
त्यामुळे या प्रश्नाबाबत सरकारने गांभीर्याने तात्काळ निर्णय न घेतल्यास दुध उत्पादक हे दुध बंद आंदोलन करतील आणि हि वेळ आमच्यावर या सरकारने आणू नये असा ईशारा देखील आ.धस यांनी यावेळी दिला.तर शासनाच्या या दुर्लक्षामुळे दुध उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून दुधाळ जनावरांना कमी प्रमाणात चारा आणि पशुखाद्य द्यावे लागत असल्याने यापुढे पशुधन देखील संकटात येणार आहे.दि.1 आॕगष्ट रोजीच्या प्रतिकात्मक आंदोलनानंतरही पुणतांबा पॕटर्न सारखे दुध उत्पादन बंद हे आंदोलन महाराष्ट्रभर पुकारले जाईल.असा ईशाराही त्यांनी शेवटी दिला आहे.
...........................................
मराठा आरक्षण प्रश्नी राज्याचे माजी मुख्यमंञीच जर अधिकारी वेळेवर माहिती देत नाहीत असे म्हणून हजारो तरुणांचे भवितव्य टांगणीला लावत असतील तर हे या राज्याचे आणि मराठा समाजाचे दुर्देव असल्याचेही आ.धस म्हणाले.
COMMENTS