*मनाई आदेशाचा भंग करून लग्न समारंभ आयोजित केल्यामुळे गुन्हा दाखल*.

    *जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे*.   पालघर दि. 17 : कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव जिल्ह्यात रोख्याण्यासाठी जिल्हा प्रशसनाच्यावतीने वेळोवेळी मनाई...


 


 


*जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे*.


 


पालघर दि. 17 : कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव जिल्ह्यात रोख्याण्यासाठी जिल्हा प्रशसनाच्यावतीने वेळोवेळी मनाई आदेश जारी करण्यात आले होते या आदेशाचा भंग करून मोखाडा तालुक्यातील मौजे साखरी येथील लॅब तंत्रज्ञ यांनी विवाहा कार्यक्रम आयोजित करून कोव्हीड 19 चा प्रसार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी सांगितले.


        मोखाडा तालुक्यामधील मौजे - साखरी येथील पोलीस पाटील हिरु पाटील रा.साखरी पो.वाशाळा यांनी दि .१६ / ०६ / २०२० रोजी पोलीस ठाणे अंमलदार , पोलीस ठाणे मोखाडा यांचे समक्ष जव्हार येथील सदानंद हॉस्पीटल येथील लॅब टेक्निशिअन रा.साखरी पो.वाशाळा ता.मोखाडा यांचे विरुध्द फिर्याद दिली असुन सदर व्यक्तीचे केळघर येथील एका मुलीबरोबर दि .११ / ०६ / २०२० रोजी लग्नाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता.दि .१० / ०६ / २०२० रोजी सायंकाळी ६.०० वाजे दरम्यान सदरच्या लॅब टेक्निशिअन यांचे घरी हळदिच्या समारंभामध्ये ७०-८० लोक सहभागी झाले होते.सदर हळदिच्या समारंभामध्ये मौजे - साखरी गावचे पोलीस पाटील यांनी लॅब टेक्निशिअन यांस सदर कार्यक्रमाची तहसिलदार किंवा पोलीस ठाणे यांचेकडुन लेखी परवानगी घेतली आहे का ? अशी विचारणा केली असता त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी सांगितले


   . सध्या जिल्हयामध्ये तसेच तालुक्यामध्ये कोव्हिड -१ ९ या विषाणूचा प्रादुर्भाव असुन राज्य साथरोग प्रतिबंधक कायदा १८ ९ ७ दि .१३ मार्च २०२० रोजी पासुन लागु करुन खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली असुन संबंधित लॅब टेक्निशिअन यांनी व कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या लोकांनी मास्क न वापरणे , गर्दी करणे व सोशल डिस्टन्सचे ( Social Distance ) कोणतेही पालन न केल्याचे निदर्शनास असलेबाबत नमुद केले आहे.सदरहू बाबींमुळे साखरी गार्वात व मोखाडा तालुक्यामध्ये मोठया प्रमाणावर कोरोना विषाणूचा ( कोव्हिड -१ ९ ) संसर्ग झाला असुन सदर व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केले आहे . सदर लॅब टेक्निशिअन या इसमाने स्वत : च्या लग्नात ७०-८० लोकांचा जमाव करुन शासनाचे ठरवून दिलेल्या कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता मनाई आदेशाचा भंग केला म्हणून लॅब टेक्निशिअन रा.साखरी पो.वाशाळा ता.मोखाडा जि.पालघर यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील ५१ ( B ) भारतीय दंड संहिता कलम १८८ व २६ ९ भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८ ९ ७ सी नुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ ( १,१३७ चा भंग केल्याने गुन्हा दाखल करणेत आलेला आहे .


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel