स्टेट बँकेत खातेदारांच्या तक्रारी खोक्यात ; निवारण होणार कधी ?
बँकेत कमीत कमी आमदारांच्या शिफारसीला तरी महत्व द्या ; बँकेसमोर नागरिकांमध्ये चर्चा !
माजलगाव/भास्कर गिरी
स्टेट बँकेची कुठलीही सुविधा खातेदारांना घ्यायची असेल तर सर्वसामान्य जनतेला बँकेच्या दारामध्ये खेटेचं मारावे लागतात हे काही नवं नाही ! आजवर बँकेत दलालांचे कामं तात्काळ होतात हे सर्वच बँकेमध्ये पहावयास मिळतं ! बँकेतील कर्मचाऱ्याना ही वयोवृद्धांंची कामं करण्यास तसा मनोभाव राहिला नाही.वयोवृद्ध नागरिकांची व शेतकऱ्यांची बँकेच्या दारी आजवर हेळसांडचं होत असून हे थांबणार कधी ? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितचं आहे ! सततचे बँकेत येण्यास कंटाळलेल्या नागरिकांना आमदार प्रकाश सोळंके यांचे शिफारस पत्र ही त्या खोक्यात टाकावे लागले असल्याने कमीत कमी आमदारांच्या शिफारसीला तरी बँक अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी महत्व द्यावे असा आरूड बँकेसमोर नागरिकांमध्ये एकावयास मिळाल्याने खोक्यात टाकल्या जाणाऱ्या तक्रारी अर्ज व बँक सुविधेबाबत निवारण होणार तरी कधी ?
कोरोनाच्या संसर्गामुळे बँके बाहेर सकाळ पासून रांगा लागत असून खात्यावरील रक्कम काढण्यास व पैसे खात्यावर भरण्यास सध्या बँकेकडून मुभा देण्यात आली आहे.बँकेची इतर सेवा मिळवण्यास बँक खातेदाराला लेखी अर्ज करावे लागत आहेत. त्यासाठी बँकेच्या गेट समोर एका खोक्यात लेखी अर्ज आणि बँकेच्या इतर सुविधा सुरु करण्यासाठी भरलेले फॉर्म त्या खोक्यामध्ये टाकावयास बँकेचा सुरक्षा रक्षक सांगतो परंतु त्या लेखी अर्जाकडे व भरलेल्या फॉर्मकडे बँक प्रशासन ढुंकूनही पाहत नसल्याने नागरिक बँकेसमोर ओरडू लागले आहे.
बँकेत सध्या शेतकरी पीक कर्ज घेण्यासाठी आणि कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी व जनधन खाते धारकांना खात्यावर जमा झालेली रकम काढण्यास लगबगीने बँकेचे समोर सकाळी 9 वाजल्या पासूनच रांगेत उभे रहात आहेत तर काहींना खात्यावर जमा झालेलं अनुदान उचलुन खरीप पेरणीसाठी बियाणे घेण्यासाठी बँकेत दिवसभर उभं रहावं लागत असून सदरील ही कामं बँक प्रशासन चार वाजेपर्यंत व्यवहार सुरु ठेवत असून चार वाजेच्या नंतर मात्र खातेदारांना वापस पाठवले जात असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून बँकेत एका दिवशी कुठलं काम मार्गी लागत नसल्याने रोज-रोज येवून खातेदार मात्र बँकेच्या कामकाजाला वैतागले आहेत.-
बँक खातं सुरु करण्यास आमदारांची शिफारस !
सर्वसामान्य नागरिकांची कामं बँक प्रशासन वेळेवर करीत नसल्याने व आधार लिंक होत नसल्याने कामं सोडून बँकेत शेतकऱ्यांसह नागरिकांना खेटे मारावे लागत आहेत.बँकेचे कर्मचारी शुल्लक कामं करीत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना खातं सुरु करुन त्या खात्यावर गॅस ची सबसिडी,जनधन योजनेचा लाभ मिळत नसल्याने आमदार प्रकाश सोळंकेंची शिफारस असेलेले पत्र बँकेच्या गेटसमोर ठेवण्यात आलेल्या खोक्यात दिसून आले.शुल्लक कारणास जर आमदारांना शिफारस करावी लागत असेल तर बँक प्रशासन कोणतं काम करतंय ? याकडे आमदार प्रकाश सोळंके यांनी स्वतः लक्ष घालू शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या समशा दूर कराव्यात असे नागरिक बोलत आहेत.
COMMENTS