कॉंग्रेस नेते दत्ता कांबळे यांच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांना मिळाले फेरफार नकल
कॉंग्रेस कमिटी अनु .जाती विभागाचा शेतकऱ्यांना मिळाला आधार
माजलगाव :(प्रतिनिधी ): कोरोना १९ च्या प्रादुर्भावाने समाजातील प्रत्येक घटक हा आर्थिक अडचणीपोटी हवालदिल झाला असून , अश्या परस्थीतीत शेतकरी वर्ग पेरणी पूर्व मशागतीत गुंतलेला असून बी भरणा चे सावट अजून बाकी असल्याने शेतकरी वर्गाची पीककर्ज मिळवण्यासाठी धावपळ सुरू आहे .
अश्या परस्थीतीत धारूर तहसील कार्यालय प्रशासनाने आवक जावक चे कार्यालय दुपारी अडीच वाजताच बंद केल्याने शेतकऱ्यांना आपला फेरफार मिळण्यास अडचण निर्माण झाली .यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी कॉंग्रेस कमिटी अनु .जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता कांबळे यांना संपर्क साधून सदरील समस्या त्यांच्या कानावर घातली , तेंव्हा शेतकरी प्रश्नाला प्राधान्य देत दत्ता कांबळे यांनी तहसील कार्यालय येथे स्वतः जाऊन तहसील प्रशासनाची कानउघडनी करत , स्वतः कार्यालयात बसून जिल्हाधिकारी यांनी कोरोना १९ च्या पार्श्वभूमीवर घालून दिलेली संचारबंदी संधर्भातिल शारीरिक अंतर व इतर नियमांचे पालन करून शेतकऱ्यांना आपल्या फेरफार नकला घेण्याचे आवाहन करून सुरळीतपणे फेरफार नकलाचे तत्काळ वाटप करण्यासाठी तहसील प्रशासनाला भाग पाडले .यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी अत्यावश्यक असणाऱ्या फेरफार मिळून दिल्याबद्ल कॉंग्रेस कमिटी अनु .जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता कांबळे यांचे आभार व्यक्त करत , कॉंग्रेस कमिटीचा शेतकऱ्यांच्या अडचणीत आधार मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या .यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हाभरातील बँकाना फेरफारची अटीच्या अनुशंगाने आवश्यक त्या सूचना कराव्यात असे आवाहन दत्ता कांबळे यांनी केले .
यावेळी कॉंग्रेस कमिटीचे जेष्ठ नेते विजयशिंह दिक्कत , कॉंग्रेसचे जेष्ठ नेते शुभराव सोळके ,अनु .जाती विभागाचे तालुकाध्यक्ष बाबुराव गायसमुद्रे , सामाजिक कार्यकर्ते विजयलोखंडे संग्राम लोखंडे , अमर सोळके ,रोहिदास हिवाळे सह तालुक्यातील शेतकरी वर्ग उपस्थीत होते .
COMMENTS