नांदेड ग्लोबल मराठवाडा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा प्रवक्तेपदी प्रल्हाद उमाटे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती खा. प्रताप पाटील...
नांदेड ग्लोबल मराठवाडा
भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा प्रवक्तेपदी प्रल्हाद उमाटे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्ह्याच्या विविध पदांंची निवड करण्यात आली. या निवडीत भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष, सरचिटणीस, विधानसभा अध्यक्ष यांच्या निवडी केल्या गेल्या आहेत.
गत अनेक वर्षापासून जिल्ह्याचे भाजपचे प्रवक्तेपद रिक्तच होते. या पदावर भाजपचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी पत्रकार प्रल्हाद उमाटे यांची भाजपच्या जिल्हा प्रवक्तेपदी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केल्या जात आहे.
COMMENTS