- शहरात मास्क न वापरणारावर नगरपालिका ची कारवाई थंडावली
माजलगाव/भास्कर गिरी
देशात गेली तीन महिन्या पासून कोरोना विषाणू ने थैमान घातले असल्याने शासन कोरोना ला घालवण्यासाठी अनेक उपाय योजना राबवत आहे. मात्र काही नागरिकांना या कोरोना चे गांभीर्य राहिल्याचे दिसत नाही. काही तर तोंडाला मास्क न लावता खुलेआम शहरात गर्दीच्या ठिकाणी दिसत आहेत. सुरुवातीला देशात मुंबई, पुणे, औरंगाबाद कोरोना ची लागण झाली म्हणून नगरपालिका ला आदेश देण्यात आले आणि माजलगाव नगरपालिका ने लोकांना तोंडाला मास्क लावण्याची सक्ती केली होती आणि तोंडाला मास्क न लावणाऱ्या व्यक्ती कडून दंड ही वसूल केला मात्र नगरपालिका च्या हद्दीत एक कोरोनाचा रुग्ण निघाला असताना ही याचे लोकांना काहीच वाटत नाही तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असताना नागरिक नगरपालिका च्या नाकावर टीचून तोंडाला मास्क न लावतात शहरात खुलेआम फिरताना दिसत आहेत. मात्र नगरपालिका याच्या कडे काना डोळा करत आहे.
COMMENTS