नवी दिल्ली, 7 जून : देशभरात कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या नियंत्रणात आणणे अवघड जात आहे. त्यात अनेक तज्ज्ञांनी कोरोनासह जगण्याचं आवाहन केलं जात आहे. अनलॉक 1 नंतर देशातील अनेक ठिकाणी जनजीवन सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये देशातील शाळांबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
HRD मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 3 जून रोजी झालेल्या मुलाखतीत त्यांनी देशातील शाळा आणि महाविद्यांबाबत मोठा खुलासा केला आहे. कोरोनाच्या महासाथीत 16 मार्चपासून देशातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. ऑगस्ट 2020 नंतर शाळा व महाविद्यालये पुन्हा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.तब्बल 33 कोटी विद्यार्थी शाळा केव्हा सुरू होणार याची वाट पाहत आहेत. पालक व शिक्षकांसोबत झालेल्या चर्चेनंतर एचआरडी मंत्री रमेश निशंक पोखरिया यांनी शाळा आणि महाविद्यालये ऑगस्टनंतर पुन्हा सुरू होणार असल्याचे सांगितले. त्यातही 15 ऑगस्टनंतर शाळा व महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय 15 ऑगस्टपर्यंत सर्व परीक्षांचा निकाल देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मंत्र्यांनी यांनी सांगितले.याबाबत अद्याप काहीच समजलेले नसताना या ऑगस्ट महिन्यानंतर सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी सांगितले
COMMENTS