माजलगाव : प्रतिनिधी
प्रांजली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,माजलगावच्या वतीने माणुसकीच्या भावनेतून लॉकडाउनच्या कठीण काळात माजलगाव परिसरातील सावरगाव कारखाना पारधी वस्ती,शहापूर पारधी वस्ती,किट्टी आडगाव,एकदरा भिल्ल वस्ती,आंबेडकर नगर, इंदिरा नगर,पंचशील नगर,रायंदर वस्ती,भिक्षुकी कुटूंब,कोळसा मजूर,ऊसतोड मजूर आशा शंभर पेक्षा जास्त गरजू कुटूंबाना मोफत फूड किट्स वितरित करण्यात आल्या.
देशभरात लॉकडाउन असल्यामुळे मावळ तालुका जिल्हा पुणे येथील बारा कोळसा बनवण्याचे काम करणारे मजूर लहान मुलांसह माजलगाव येथे दोन महिन्या पासून अडकून पडले होते.हे समजताच प्रांजली संस्थेचे सचिव ऋषिकेश टाकणखार यांनी त्यांना अन्न धान्य पुरवले व लॉकडाउन शिथील होताच मजुरांसाठी मोफत बसची व्यवस्था करून त्यांना सुखरूप त्यांच्या गावी सोडले.
या कामात त्यांना युवान संस्थेचे संदीप कुसलकर यांनी मोलाचे सहकार्य केले.दोन महिने या लोकांची राहण्याची व्यवस्था नितीन क्षीरसागर यांनी केली.
जातांना त्यांना पुष्पहार देऊन निरोप देण्यात आला, प्रांजली संस्थे मार्फत त्यांना पाणी,बिस्किट्स,नाष्टा देण्यात आला.महेश ठोंबरे यांच्या वतीने सर्व कामगारांना मास्क वितरित करण्यात आले.या कामाचे नियोजन प्रांजली संस्थेच्या वतीने अजय तरकसे सर,प्रदीप जोगदंड सर,बाबसाहेब जाधव सर,विनय पोटभरे,सम्राट डोंगरे,बबन चोपडे यांनी केले.
COMMENTS