शेवटी मास्क बांधून जगाच्या पोशिंद्याने घेतला निरोप
नाव-ज्ञानेश्वर कदम
वय -28
गाव-मार्लेगाव, ता.उमरखेड, जी.यवतमाळ
गळफास घेतल्यावर जीव मुठीतून सुटू नाही म्हणून त्याने हाताच्या मुठी गच्च आवळल्या, मरणाच्या दरीतही त्याने स्वतःला एकाच पायाने झोकून दिलं, मात्र गळ्या भोवती फास आवळला गेला... मुठी सैल पडल्या आणि तो समाजाच्या अब्रुची लक्त्तर बनून लटकला.....
सोबत जोडलेला फोटो त्याचं ज्ञानेश्वरचा आहे.. ज्याने *कोरोनाची लागण होऊन आपला जीव जाऊ नये म्हणून तोंडावर घातलेला मास्क, आत्महत्या करतानाही तसाच ठेवलेला होता*
जगण्यावर एव्हढं प्रेम करणारा ज्ञानेश्वर एका ठिकाणी लिहतो
मला जगायचं होतं, माझेही स्वप्न होती, मला मुलीला शिकवायच होतं, आत्महत्या करणं गुन्हा आहे मात्र तो गुन्हा मला करावा लागतोय... त्याने लिहलेली ती चिठ्ठी सोबत जोडलीय ती चिट्ठी लक्षपूर्वक वाचायला आपल्याला केवळ 5 मिनिटं लागतात मात्र चिट्ठीतील एकेक शब्द लिहतांना ज्ञानेश्वरचा हात किती जड पडला असेल ह्याची कल्पना करा...
मग प्रश्न हा उरतो की उच्च शिक्षित, प्रामाणिक कष्टाळू आणि तरुण असतांनाही ज्ञानेश्वरने एव्हढ टोकाचं पाऊल का उचललं ..? मात्र या प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वर नाहीतर समाज म्हणून आपल्याला द्याव लागणार आहे कारण हा *प्रश्न त्याच्या आत्महत्येनं निर्माण केला नाहीये तर त्यानें त्याच्या हक्कासाठी उभारलेल्या लढ्याकडे आपण केलेल्या दुर्लक्षाने उभा झालाय*
*एक दाणा पेरला की त्यातून शेकडो दाणे उगवतात त्यामुळे जगाच्या पाठीवर अत्यन्त शाश्वत आणि फायदेशीर असलेला एकमेव व्यावसाय म्हणजे शेती"* असं एका मोठ्या अर्थतज्ञानं लिहून ठेवलय, मात्र या व्यवसायावर येणाऱ्या अस्मानी संकटा बरोबर सुल्तानी आणि शैतानी संकटाचा सामना कसा करायचा या बद्दल लिहायचं तो अर्थतज्ज्ञ कदाचित विसरला. दुसरीकडे *शेकडो वर्षांपासून शेतकरी नावाच्या पोशिंद्यांची पिकवलेली कष्ट ओरबाडणार-या माय- बाप सरकारनेही अशा संकटातून त्याला मुक्त करायला कुठलीच स्वतंत्र यंत्रणा उभी केली नाही* आणि अशाच एका संकटासमोर ज्ञानेश्वराही बळी पडला
शेतात काबाड कष्ट करून त्यानें अनेक वेळा सोनं पिकवलं, मात्र शेताला जाणाऱ्या रस्त्यावरून शेजाऱ्यांनी वाद घातला, वाद विकोपाला गेला त्याच्यावर हल्ले झाले, त्याने न्यायालयात दाद मागितली निकाल त्याच्या बाजूने लागला मात्र तरीही रस्ता आडवला जाऊ लागला, त्याने पुन्हा पोलिसांकडे धाव घेतली, माध्यमांचे उंबरठे झिजवले पण कुणीही त्याच्या मदतीला आलं नाही, *पोलीस म्हणाले विषय न्यायप्रविष्ठ आहे, लोकप्रतिनिधी म्हणाले कोरोना नंतर बघू आणि माध्यम सेलिब्रिटीच्या आत्महत्येची वाट पाहत होते*
COMMENTS