नांदेडमध्ये कोरोनाचा धुमाकूळ सुरूच !
* नवे २४ रुग्ण सापडले
* एकाच दिवशी सर्वात
जास्त रुग्णांची नोंद
* एकूण रुग्ण २८६ झाले
नांदेडमध्ये कोरोनाचा धुमाकूळ सुरूच असून मंगळवारी एकाच दिवशी
२४ रुग्णांची नव्याने भर पडली आहे.दररोज ही संख्या झपाट्याने वाढत असून ही संख्या ३००च्या जवळ येवून ठेपली आहे. त्यात मुखेड तालुक्यात रुग्णांची संख्या वेगाने वाढत चालल्याने लोकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.दरम्यान शहरात दररोज नवीन कंटेंटमेंट झोन निर्माण होत असून ही नांदेडकरांसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे. मंगळवारी २४ नवे रुग्ण आढळल्याने एकाच दिवशी एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
^आज सापडलेले रुग्ण या भागातील आहेत -
- शिवविजय कॉलनी - ४
- सोमेश कॉलनी - ४
- श्रीकृष्णनगर ,- २
- दिपनगर - १
- चिखलवाडी - १
- परिमलनगर - १
- विशालनगर - १
- बरकतपुरा - १
- फरांदेनगर - १
- एमजीएम परिसर - १
- मुखेड - ६
- सेलू -1
बॅँकेतील एका कर्मचाऱ्यामुळे अनेकजण संक्रमित !
महावीर चौक भागात असलेल्या त्या बॅँकेतील एका कर्मचाऱ्याला झालेली लागण वेगाने पसरली असून अगोदर बॅँकेचे अनेक कर्मचारी व त्यानंतर आता काही कर्मचाऱ्यांचे कुटुंब कोरोनाबाधित झाले आहे.हा आकडा आणखी वाढणार की थांबणार हे सांगणे तूर्त अवघड आहे.
COMMENTS