लातूर जिल्ह्यात आज पुन्हा एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे लातूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची सं...
लातूर जिल्ह्यात आज पुन्हा एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे लातूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 15 वर पोहंचली आहे. भिवंडी येथून औसा तालूक्यातील भेटा येथे आलेल्या 25 वर्षीय युवतीस कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालेले होते. 21 जून रोजी ती भेटा येथे आलेली होती. उपचारादरम्यान सदरील रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक संजय ढगे यांनी दिली आहे. लातूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूची संख्या यामुळे 15 वर पोहचली आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूच्या दरापेक्षा लातूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचा दर अधिक झालेला आहे ही लातूरकरांसाठी गंभीर बाब आहे
COMMENTS