केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले वर्ष नुकतेच पूर्ण झाले आहे. हे वर्ष अनेक दृष्टीने ऐतिहासिक ठरले आहे.
या रॅलीचे प्रास्ताविक राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत.
या रॅलीमध्ये महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे आणि प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील तसेच मुंबई अध्यक्ष श्री. मंगलप्रभात लोढा हे देखील सहभागी होणार आहेत.
या रॅलीमध्ये मुंबई तसेच कोंकण विभागातून तीस लाख लोक ऑनलाईन सहभागी होणार आहेत.
या रॅलीची माहिती आज मुंबई भाजपाच्या वसंत स्मृति कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुंबई भाजपा अध्यक्ष श्री.मंगलप्रभात लोढ़ा, सांसद श्री. मनोज कोटक, विधायक श्री.राहुल नार्वेकर, भाजपा प्रवक्ता श्री.भालचंद्र शिरसाट, मुंबई भाजपा महामंत्री श्री.अमरजीत मिश्रा, भाजपा मुंबई मनपा पक्षनेता श्री.विनोद मिश्रा हे उपस्थित होते |
रैली चे संयोजक खासदार श्री.मनोज कोटक यांनी सांगितले कि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत योजनेची माहिती या रैलीद्वारे जनते पर्यंत पोहोचवणार आहोत. कोरोना महामारीमुळे चालू असलेल्या लॉकडाउन मध्ये प्रत्यक्ष सभांना परवानगी नाही. त्यामुळे लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी भाजपाने हा व्हर्च्युअल रैलीचा मार्ग निवडला आहे. जनतेशी थेट संवादावर भाजपचा भर आहे, विश्वास आहे. या माध्यमातून भाजप जनतेसमोर अनेक महत्वाचे विषय नेणार आहे, असेही ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेत आमदार श्री.राहुल नार्वेकर यांनी पत्रकारांना रैली च्या तयारीची माहिती दिली.
सदरची व्हर्च्युअल रॅली महाराष्ट्र भाजपच्या फेसबुक पेजवरून प्रसारित करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे युट्युब वरून खालील लिंकवर या व्हर्च्युअल रॅलीत सहभागी होता येणार आहे.
(मिलिंद दोंदे
प्रसिद्धी प्रमुख)
COMMENTS