*आपल्या गावाच्या विकासासाठी महत्वाचा सेमिनार 7 व 8 जून -दिपक मोरताळे*💧💧
नांदेड ( खास प्रतिनिधी) 6 जून 2020
*💧💧गावाचा पाण्याचा प्रश्न, तसेच मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवणारा हा सेमिनार*💧💧
*जलसाक्षरतेच्या माध्यमातून शाश्वत ग्रामजलनियोजन*
*वेबिनार इ संवाद*
( मग्रारोहयो आणि आपलं गाव आपला विकास इतर योजना यांचे अभिसरणातून)
मित्रांनो जलसाक्षरतेच्या माध्यमातून मागील काही वर्षांत पाण्यावर काम करण्यासाठी आपण संपूर्ण राज्यभर "स्वयंस्फूर्त आणि स्वयंप्रेरीत" लोकांची फळी निर्माण केली आहे.
*मार्गदर्शन:श्री अतुल कपोले- सहसचिव -जलसंपदा विभाग महाराष्ट्र, मुंबई*
*श्री शरद कुलकर्णी - CEO-Z.P.नांदेड*
*श्री आनंद पुसावळे- संचालक- संचालक,जलसाक्षरता केंद्र, पुणे*
*श्री डॉ सुमंत पांडे- कार्यकारी संचालक, जलसाक्षरता केंद्र यशदा,पुणे*
*डॉ वडगबाळकर , श्रीमती अश्विनी कुलकर्णी,नरसिंह मित्रगोत्री व तज्ञ* मार्गदर्शन करणार आहेत.
नदी पुन्हा अविरल आणि निर्मल होणे आणि महाराष्ट्र पाणीदार होणे हे अंतिम उद्दिष्ट असले तरी, *ग्रामपाणलोटांच्या पाण्याचा ताळेबंद* ,
*पाणीवापर संस्थांच्या मार्फत पाण्याचे व्यवस्थापन* आणि
*शालेय जलसाक्षालरता* हे व्यापक कृतिशील उद्दिष्ट आहेत.
आपण पाण्याच्या ताळेबंद या विषयावर राज्यात जवळपास 300 प्रवीण प्रशिक्षक तयार केले आहेत.
*पाण्याचा ताळेबंद झाला पुढे काय?*
गावातील पाणीटंचाई कमी करणे आणि लोकसहभागी जलव्यवस्थापन करण्यासाठी ,ताळेबंद काढल्यावर (शिवार फेरी करतो)जी कामाची यादी निघेल त्यात काही जुने तलाव बांध दुरुस्ती तर नवीन कामे (माथा ते पायथा)प्रस्तावित असतील(भूभाग आणि जमिनीचा अपधाव यावर अवलंबून असतो).
ते काम कसे करावे?त्यासाठी निधी कोठून व कसा मिळेल?
*याचे उत्तर महात्मा गांधी रोजगार हमी योजना आणि पंधरावा वित्त आयोग यात आहे.*
_या योजनेत निधीची कमतरता नाही.योजना समजून घेणे आणि त्याची योग्य अमलबाजवणी करणे हेच यातील यश आहे._
कोरोना मूळे लाॕकडाऊनच्या काळात शहराकडून गावाकडं आलेल्या आपल्याच बांधवाना मागणीनुसार रितसर अकुशल कामे देखील उपलब्ध करुन देता येतील,आणि त्यांना त्यांच्या श्रमाचे मूल्य देखील मिळेल.
हे समजून घेण्यासाठी
*दिनांक ७ जुन रविवार आणि
८जून सोमवार* या दिवशी सकाळी 10 ते 3 या वेळेत, ऑनलाइन वेबिनार आयोजित केला आहे,
१. लिंक वर नोंदणी करून जॉईन व्हावे लागेल. नोंदणी करताना आपला मोबाईल आणि इमेल जरूर द्यावा
२.मोबाइल, लॅपटॉप, अथवा डेस्कटॉप वरून जॉईन होता येते.
३.सोबत वही पेन,पेन्सिल असावी, ४.मोबाइल असेल तर हेडसेट आवश्यक आहे.
५.मोबाइल पूर्ण चार्ज असावा.
६.पिण्यासाठी पाणी जवळ ठेवावे
७.प्रश्न असतील तर ते त्या त्या वेळी लिहून ठेवावेत आणि प्रश्नोत्तराच्या वेळी विचारावेत.
आपली ही कसोटी आहे, लोकडउन नंतर एक उत्साह आहे तो सत्कारणी लावावा.
सहभागी होण्याऱ्यांचे मूल्यमापन होणार आहे.
सोबत वेळापत्रक दिले आहे
*जलसाक्षरता वेबिनार ला जॉईन कसे व्हयचे* ?
खूप सोपे आहे, खलील लिंक वर क्लिक करायचे,त्यात नाव फोन नंबर आणि इमेल टाकायचा आणि सरळ जॉईन व्हायचे। मीटिंग id किंवा पासवर्ड ची गरज नाही.
दिनांक *७ जून आणि 8 जून ची लिंक वेगवेगळी आहे*
*७ तारखेची लिंक खाली देतोय*
*(उद्या सकाळी ठीक 9.40 ला जॉईन व्हावे म्हणजे गोंधळ होणार नाही)*
https://attendee.gotowebinar.com/register/2078875629340339724
*दिनांक ८ जून ची लिंक* 👇
ही लिंक क्लिक करून ८तारखेस म्हणजेच सोमवारी सकाळी ९.४० ला जॉईन व्हावे
https://attendee.gotowebinar.com/register/8837672561318571534
*अधिक माहिती साठी संपर्क*
*श्री फांजेवाड - गट विकास अधिकारी, लोहा प.स.-9422556837*
*श्री दिपक मोरताळे- जलनायक,नांदेड -9422174647*
*श्री बाबुराव केंद्रे- जलनायक,नांदेड- 9022318605*
*आयोजक*
*डॉ सुमंत पांडे आणि आनंद पुसावळे*
जलसाक्षारता केंद्र यशदा पुणे
COMMENTS