आणिबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या मिसाबंदींचा आज मुंबईत एका छोटेखानी कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा हे प्रामुख्याने उपस्थित होते. रमेश मेहता, संजीव परब, लढ्ढाराम नागवानी, पुरूषोत्तम शेणॉय, मिलिंद करमरकर, चिमणभाई मेहता यांचा सत्कार देवेंद्र फडणवीस यांनी केला. या सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त करताना आणिबाणीच्या काळातील आठवणी, त्या काळात केलेला संघर्ष आणि अनुभव कथन केले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आणिबाणी हा स्वतंत्र भारतातील एक काळा अध्याय आहे. काल या घटनेला 45 वर्ष पूर्ण झाले. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी संग्रामात भाग घेतला, त्यांना आपण स्वातंत्र्यसैनिक म्हणतो, त्या अर्थाने या योद्ध्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष केला. त्यामुळे ते लोकशाहीसंग्रामसैनिक आहेत. म्हणूनच आपल्या सरकारच्या काळात त्यांना मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या छोटेखानी कार्यक्रमाला सत्कारमूर्तींचे कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते.
COMMENTS