बुद्ध विहारे ही ज्ञानाची केंद्र बनावीत- भिक्खु धम्मसेवक महाथेरो

नालंदा नगरीतील बुद्ध विहारात बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना; भव्य मिरवणूक आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन नांदेड,२३- बुद्ध विहारांची उभारणी ही के...


नालंदा नगरीतील बुद्ध विहारात बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना; भव्य मिरवणूक आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन




नांदेड,२३- बुद्ध विहारांची उभारणी ही केवळ वास्तू निर्माण करण्यापुरती मर्यादित न राहता, विहारांमधून नियमित धम्मवर्ग, प्रवचन, अभ्यास आणि प्रबोधनाचे उपक्रम सुरू राहावेत. दर रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून बुद्ध विहारे ही ज्ञानाची आणि संस्कारांची केंद्रे बनावीत, असे प्रतिपादन भिक्खु धम्मसेवक महाथेरो यांनी केले.

     नांदेड येथील नालंदा नगरमधील नालंदा बुद्ध विहारात रविवार दि. २२ नोव्हेंबर रोजी बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भिक्खु विनयबोधीप्रिय महाथेरो, भिक्खु पय्यबोधी थेरो, भिक्खु शीलरत्न थेरो आणि भिक्खु बुद्धभूषण यांची प्रमुख उपस्थिती होती.

     मंगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नांदेड-वाघाळा महापालिकेच्या महापौर कविता मुळे, महाउपासक एस. पी. गायकवाड, नगरसेविका सुनीताताई जोंधळे, नगरसेवक सतीश देशमुख, नगरसेविका प्रतिनिधी आफिया काजी नाफे, अॅड. धम्मपाल कदम, माधवदादा जमदाडे, बापूराव गजभारे, रवी पंडित, नालंदा सोसायटीचे सचिव के. एच. वन्ने, प्रा. डॉ. शुद्धोधन गायकवाड, प्रा.डाॅ मंगेश अटकोरे,केशव खिराडे, तोलाजीराव अटकोरे, पीएसआय हानमंते, रमेश नरनवरे, महेश एडले, राहुल गजभारे आदींची उपस्थिती होती.

      पुढे बोलताना भिक्खु धम्मसेवक महाथेरो म्हणाले की, बौद्ध बांधवांनी आचरणशील जीवन जगण्यावर भर द्यावा. दहा पारमिता, पंचशील आणि आर्य अष्टांगिक मार्ग यांचा नियमित अभ्यास करून त्यानुसार जीवन जगावे. लहान मुलांवर योग्य संस्कार घडविण्यासाठी बुद्ध विहारांमध्ये धम्मवर्ग आयोजित करावेत, त्यांना गाथा पठण शिकवावे आणि धम्माचे विचार बालमनावर रुजवावेत. अशा उपक्रमांमधूनच बुद्ध विहारे समाजाच्या ज्ञान, प्रबोधन आणि संस्कारांची केंद्रे बनतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

      कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी सात वाजता शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून नालंदा नगर बुद्ध विहारापर्यंत बुद्धमूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भिक्खु बुद्धभूषण यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या मिरवणुकीत उपासक-उपासिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यानंतर नालंदा बुद्ध विहारात बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना आणि ध्वजारोहण करण्यात आले.

     या विहारासाठी बुद्धमूर्तीचे दान कालवश गीताबाई बळीराम अटकोरे यांच्या स्मरणार्थ उपासिका चित्रा तोलाजीराव अटकोरे-मालेगावकर यांनी दिले. उद्घाटनप्रसंगी आमदार बालाजी कल्याणकर यांनी बुद्ध विहाराच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम करून देण्याचे आश्वासन दिले. तर महापौर कविता मुळे यांनी परिसरातील रस्त्यावर सांची स्तूपाच्या प्रतिकृतीची कमान उभारण्यार असल्याचे सांगितले.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. शुद्धोधन गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन त्रिरत्न अटकोरे यांनी केले, तर के. एच. वन्ने यांनी आभार मानले. याप्रसंगी जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांसाठी भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी क्रांतिसूर्य बुद्ध-भीम गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. गायक क्रांतीकुमार पंडित आणि त्यांच्या संचाने बहारदार गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नालंदा नगर, आदर्श नगर आणि बापू नगर येथील उपासक-उपासिका, भीम जयंती मंडळ, महिला मंडळ तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group