जिल्ह्यात ६० मीटरपेक्षा खोल बोअरवेल खोदकामावर बंदी; रिग मशीनची १५ दिवसांत नोंदणी व जीपीएस अनिवार्य
नांदेड, दि. १६ नोव्हेंबर:
सन २०२६ च्या खरीप हंगामात झालेली पर्जन्याची मोठी तूट आणि खालावलेली भूजल पातळी लक्षात घेता नांदेड जिल्ह्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी दोन अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. जिल्ह्यातील सर्व १६ तालुके पुढील एक वर्षासाठी 'पाणीटंचाई क्षेत्र' म्हणून घोषित करून भूजल उपसा व बोअरवेल खोदकामावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच, डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातील मर्यादित पाणीसाठा आणि उपसा यंत्रणेची दुरवस्था पाहता रब्बी हंगामासाठी सिंचनाचे आवर्तन देणे शक्य नसून, उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठीच राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विष्णुपुरी प्रकल्पाची पाहणी आणि ६.२९ दलघमी पाण्याची तूट
विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून रब्बीसाठी किमान एक आवर्तन देण्याची मागणी होत होती. या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अधीक्षक अभियंता आय. एम. चिश्ती, कार्यकारी अभियंता सी. आर. बनसोड आणि उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांच्यासह प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली.
सध्या विष्णुपुरी धरणात ५७.१४ टक्के (४६.१६ दलघमी) आणि अंतेश्वर बंधाऱ्यात ७.८८ दलघमी असा एकूण ५४.०४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत होणारे १८ दलघमी बाष्पीभवन वजा जाता प्रत्यक्ष वापरासाठी केवळ ३६.०४ दलघमी पाणी शिल्लक राहणार आहे. दुसरीकडे, याच काळात नांदेड शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी ३८.९० दलघमी, औद्योगिक वापरासाठी १.७३ दलघमी आणि ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी १.७० दलघमी असे एकूण ४२.३३ दलघमी पाणी आवश्यक आहे. म्हणजेच, पिण्याच्या पाण्यातच ६.२९ दलघमीची तूट निर्माण होत आहे.
तसेच, प्रकल्पातील १८ पैकी १४ पंप नादुरुस्त असून केवळ ४ पंप ५० टक्क्यांपेक्षा कमी क्षमतेने सुरू आहेत. रायझिंग मेनच्या तिन्ही जलवाहिन्यांना मोठी गळती व फुटी पडल्याचे पाहणीत समोर आले. नवीन पाईपलाईन व पंप बसविण्याचे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होणार असल्याने, सद्यस्थितीत सिंचनासाठी पाणी सोडल्यास मोठी नासाडी होईल. त्यामुळे नांदेड शहर, ग्रामीण व औद्योगिक पाणीपुरवठ्याला प्राधान्य देत सिंचनाचे आवर्तन न देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भूजल संरक्षण व बोअरवेल खोदकामावर कडक निर्बंध
शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व तालुके यापूर्वीच दुष्काळग्रस्त घोषित झाले आहेत. आता महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ अन्वये जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात खालील कडक नियम लागू करण्यात आले आहेत:
नवीन खोदकामावर बंदी: शेती किंवा उद्योगासाठी ६० मीटरपेक्षा अधिक खोल विहीर अथवा बोअरवेल खोदण्यास सक्त मनाई आहे. सार्वजनिक पेयजल स्रोतापासून ५०० मीटर परिघात कोणत्याही कारणासाठी नवीन खोदकाम करता येणार नाही.
विद्यमान विहिरींवर नियंत्रण व अधिग्रहण: सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून १ किलोमीटर परिघातील खासगी विहिरी व बोअरवेलमधून व्यावसायिक किंवा सिंचनासाठी अनिर्बंध उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. गरज पडल्यास पिण्याच्या पाण्यासाठी अशा विहिरींचे तात्पुरते अधिग्रहण करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिले आहेत.
पाणी विक्री व टँकर वाहतुकीस मनाई: सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय भूजलाची व्यावसायिक विक्री किंवा टँकरद्वारे वाहतूक करता येणार नाही.
रिग मशीनची नोंदणी व जीपीएस अनिवार्य: जिल्ह्यातील सर्व बोअरवेल रिग मशीन मालक व चालकांनी १५ दिवसांच्या आत उपविभागीय दंडाधिकारी किंवा तहसीलदारांकडे नोंदणी करणे आणि मशीनवर जीपीएस (GPS) बसविणे बंधनकारक आहे.
भरारी पथके आणि दंडात्मक कारवाई: नियमांच्या अंमलबजावणीसाठी महसूल व पोलीस प्रशासनाची भरारी पथके नेमण्यात आली आहेत. विनापरवाना खोदकाम आढळल्यास मशीन जप्त करणे, वीजपुरवठा खंडित करणे आणि कायद्याच्या कलम ५२ अन्वये कठोर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील उपलब्ध भूजलसाठा आणि धरणातील पाण्याची मर्यादा लक्षात घेता नागरिक, शेतकरी, उद्योजक आणि बोअरवेल व्यावसायिकांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा आणि प्रशासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
नांदेड जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे सावट; सर्व १६ तालुके टंचाईग्रस्त घोषित, तर विष्णुपुरीचे पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव
जिल्ह्यात ६० मीटरपेक्षा खोल बोअरवेल खोदकामावर बंदी; रिग मशीनची १५ दिवसांत नोंदणी व जीपीएस अनिवार्य नांदेड, दि. १६ नोव्हेंबर: सन २०२६ च्या खर...
By Admin
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक असलेल्या तालुक्यातील मौजे धामणगाव येथील सय्यद बाबुपीर दर्ग...
-
नरेंद्र येरावार उमरी नांदेड उमरी तालुक्यातील ढोलउमरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री मारोती मंदिरात नवव्या वर्षी दोन हजार दिवे लावून दीपोत...
-
पुणे दि. १७ प्रतिनिधी डॉ. संकेत सावंत आणि डॉ. तनुश्री सावंत यांच्या वाकड, पुणे येथील हॅप्पीदंत डेंटल क्लिनिकचा पाचवा वर्धापनदिन आणि स्वतःच्य...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक असलेल्या तालुक्यातील मौजे धामणगाव येथील सय्यद बाबुपीर दर्ग...
-
नरेंद्र येरावार उमरी नांदेड उमरी तालुक्यातील ढोलउमरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री मारोती मंदिरात नवव्या वर्षी दोन हजार दिवे लावून दीपोत...
-
पुणे दि. १७ प्रतिनिधी डॉ. संकेत सावंत आणि डॉ. तनुश्री सावंत यांच्या वाकड, पुणे येथील हॅप्पीदंत डेंटल क्लिनिकचा पाचवा वर्धापनदिन आणि स्वतःच्य...
-
नांदेड शासकीय अध्यापक महाविद्यालय, नांदेड येथील प्राध्यापिका . डॉ. शैला भगवानराव सारंग यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासकीय अध्यापक म...
-
नांदेड, १२- अज्ञान, मोह, तृष्णा, अहंकार आणि द्वेष यासारख्या मानसिक विकारांपासून मुक्त होण्यासाठी धम्मविचारांचा अंगीकार करणे आवश्यक आहे. मैत्...
COMMENTS