राहुल गांधींमुळे नाही तर एपस्टिन फाईल कनेक्शन व पेगॅसेसमुळे भारताची जगात बदनामी.

मुंबई, दि. १६ नोव्हेंबर २६.. राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली असून माफिया खुलेआम धमक्या देत आहेत. बॉलिवूड कलाकारांच्या घरासमोर जाण्य...
मुंबई, दि. १६ नोव्हेंबर २६..
राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली असून माफिया खुलेआम धमक्या देत आहेत. बॉलिवूड कलाकारांच्या घरासमोर जाण्यापर्यंत या गुंडांची मजल गेली आहे. गुजरातच्या जेलमधूनच माफिया राज चालवले जात असून केंद्रीय गृहमंत्रीच ही गँग चालवत आहेत असा गंभीर आरोप करत गुंडांच्या खुल्या धमक्या येत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात काय फुगड्या घालत आहेत का? असा संतप्त प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, बॉलिवूडमधील अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांना धमक्या दिल्या जात आहेत, हल्ले केले जात आहेत. अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार केल्यानंतर आता अभिनेते अमिताभ बच्चन यांना लक्ष्य केले जात आहे. हल्ल्याच्या भितीमुळे अमिताभ बच्चन बुलेटप्रुफ काचेमागून चाहत्यांना भेटत आहेत, ही परिस्थिती गंभीर आहे. नोटबंदीमुळे दहशतवाद कमी होईल असा दावा सरकारने केला होता पण दहशतवाद व गुंडगिरी अधिक जोमाने फोफावली आहे. काँग्रेस सरकार असताना अभिनेते खुलेआम फिरत होते, आज तशी परिस्थिती राहिली नाही. बॉलिवूडमधील आजची भितीची स्थिती पाहता लोक म्हणत आहेत की, ‘कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन’, असे सपकाळ म्हणाले..
डिलिमिटेशन विधेयकाला इंडिया आघाडीचा विरोध..
डिलिमिटेशन विधेयकामुळे खासदारांची संख्या ५५० वरून ८५० वाढणार आहे. पण लोकप्रतिनिधींची संख्याच वाढवायची असेल तर फक्त खासदारांची संख्या का वाढवता. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचीही संख्या वाढवली पाहिजे. या विधेयकाला काँग्रेस पक्षासह इंडिया आघाडीचा पहिल्यापासूनच विरोध आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (श.प.) खासदार सुप्रिया सुळे यांनी या विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली असली तरी इंडिया आघाडीचा विरोध कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प.) सुद्धा या विधेयकासंदर्भात आवश्यक पावले उचलेल असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..
भारताची बदनामी एपस्टिन फाईलमुळे..
राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची बदनामी करतात या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राहुल गांधी यांच्यामुळे भारताची जगात बदनामी होत नाही तर मोदी सरकारच्या मंत्र्याचे नाव एपस्टिन फाईलमध्ये आल्याने बदनामी होत आहे. विरोधी पक्षाचे नेते, न्यायाधीश यांच्या फोनमध्ये पेगॅसेस स्पायवेअरच्या माध्यमातून हेरगिरी केल्यामुळे, विरोधी पक्षनेते संसदेत बोलत असताना त्यांचा माईक बंद केल्यामुळे, महागाई, बेरोजगारी, हंगर इंडेक्समुळे भारताची जगात बदनामी होत आहे. राहुल गांधी हे समाजातील विविध घटकांना भेटत असताता, हमाल, मॅकेनिक, शेतकरी, विद्यार्थी, पीडित यांना तर भेटतातच पण राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ४५०० किलोमिटरची पदयात्रा काढून सर्वांशी संवाद साधला आहे, आता गरज अमित शाह यांनी सुरक्षा बाजूला सारून जनतेत मिसळण्याची आहे, असेही सपकाळ म्हणाले..
रोहित पठारेची हत्या संताप आणणारी..
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये रोहित पठारे या तरुणाची हत्या संताप आणणारी आहे. या प्रकरणी पोलीस तपासावर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. ज्या आरोपींना पोलिसांनी अटक केली त्यांची ओळख परेड कुटुंबियांसमोर केली नाही. उलट रोहित पठारे यांच्या कुटुंबालाही धमक्या येत आहेत. राज्यात अशा प्रकारच्या हत्या होत असताना गृहमंत्री पदावर राहण्याचा देवेंद्र फडणवीस यांना अधिकार नाही, असे सपकाळ म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्या रोहित पठारे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
महाराष्ट्र NSUI चे अभियान..
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते महाराष्ट्र NSUI ने शिक्षण वाचवू, पर्यावरण वाचवू, लोकशाही वाचवू या अभियानाची सुरुवात केली. झाडे जगवा, पर्यावरण वाचवा यासह शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात NSUI राज्यभर हे आंदोलन करणार आहे. या अधिवेशनात विधिमंडळात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार वजाहत मिर्झा, राहुल बोंद्रे, NSUI चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे आदी उपस्थित होते.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group