महाराष्ट्र इंटकच्या सरचिटणीसपदी गोविंदराव मोहिते तर अध्यक्षपदी डॉ. कैलास कदम यांची फेरनिवड‌!

  ● मुंबई दि.२५: महाराष्ट्र इंटकचे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी भरगच्च उपस्थितीत पुणे,पर्वती येथील साहित्य सम्राट विजय तेंडुलकर नाट्यगृहात, क...


  ● मुंबई दि.२५: महाराष्ट्र इंटकचे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी भरगच्च उपस्थितीत पुणे,पर्वती येथील साहित्य सम्राट विजय तेंडुलकर नाट्यगृहात, केंद्रीय इंटकचे अध्यक्ष डॉ.संजीव रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले


   तत्पूर्वी महाराष्ट्र इंटकच्या जनरल कौन्सिलच्या सभेत वरील प्रमाणे इंटक नेतृत्वाच्या फेरनिवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि त्यानंतर इंटक अध्यक्ष डॉक्टर संजीवा रेड्डी यांनी प्रचंड टाळ्याच्या गजरात ही नेतृत्व निवड जाहीर केली. याप्रसंगी ज्येष्ठ काँग्रेस नेते,माजी मंत्री बाळासाहेब थोरात,केंद्रीय इंटकचे उपाध्यक्ष चंद्रप्रकाश सिंग, मोहन जोशी आदी मान्यवर नेते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.  

   

   केंद्रीय इंटकचे अध्यक्ष डॉ. संजीवा रेड्डी यांनी त्यावेळी आपल्या भाषणात, केंद्र सरकारने देशात लगू केलेल्या कामगार विरोधी चार श्रम संहिता तसेच अन्य अनिर्णित प्रश्नावर येत्या इंटक राष्ट्रीय अधिवेशनात लढ्याचा निर्णय घेण्यात येईल,असे सांगितले. 

   

    कामगार हितविरोधी चार कामगार संहिता तसेच महाराष्ट्र सरकारने पुंजीपतीचे हीत डोळ्यासमोर ठेवून केलेले कामगार विरोधी कायदे,या विरुद्ध महाराष्ट्र इंटकने वेळोवेळी रास्ता रोको, जेलभरो, निदर्शन आंदोलने करून कामगारांमध्ये दिलासा आणि एकजूट निर्माण केली आहे,यावर इंटक अध्यक्षांनी‌ पूर्णपणे समाधान व विश्वासार्हता व्यक्त केली.

   

    इंटकच्या राज्यस्तरीय अधिवेशनात एकूण १३ ठराव संमत करण्यात आले.१) चार श्रमसहिता व कामगार विरोधी धोरण रद्द करून कामगारांचे हक्क सुरक्षित ठेवण्यात यावे २) कामगारांना न्याय देताना महागाई भत्ता सामाजिक सुरक्षितता सन्मान जनक जीवनमान मिळावे.३) कंत्राटीकरण, सार्वजनिक क्षेत्रातील खाजगीकरण रद्द करुन रोजगार आबाधित ठेवण्यात यावा ४) असंघटित,कंत्राटी, स्थलांतरितांना सामाजिक सुरक्षा देण्यात यावी, ५) पर्यावरण पूरक उद्योग, ६) बेरोजगार निर्मूलन युवकांना रोजगार ७) समानता, सुरक्षितता सामाजिक ,सुरक्षा, ८) पेन्शन मध्ये वाढ करावी. ९) कृत्रिम बुद्धिमत्ता, १०)एसटीतील कंत्राटी पद्धत रद्द करा, ११) गिरणी कामगारां प्रलंबित वेतन त्वरित द्या आणि घरांचा प्रश्न मार्गी लावा. १२) सार्वजनिक भूखंडाचे खाजगीकरण थांबवा. १३) केंद्र सरकारचे सार्वजनिक उद्योग, सरकारी उपक्रम, राष्ट्रीय संपत्तीच्या खाजगीकरणाचे धोरण थांबवा. 

   राज्यस्तरीयच अधिवेशनाला महाराष्ट्र इंटकचे कार्यकारी सदस्य, सर्वश्री निवृत्ती देसाई,जी.बी.गावडे, मुकेश तिगोटे, दिवाकर दळवी,बजरंग चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते!....

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group