नांदेडः भोकर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची सुधारणा व्हावी व ते अधिक दर्जेदार व्हावेत यासाठी या भागाच्या आ. श्रीजया चव्हाण सातत्याने प्रयत्नशील असून त्याचीच फलश्रुती म्हणून कासारखेडा ते मालेगाव या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी तब्बल 64 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे.
भोकर विधानसभा मतदार संघातील सर्व गाव, वाडी, वस्त्यांना मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी आ. श्रीजया चव्हाण यांचा सातत्यापूर्ण प्रयत्न असतो. त्यामुळे भोकर विधानसभा मतदारसंघातील भोकर, अर्धापूर व मुदखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्ते दुरुस्ती व मजबुतीकरणाचे कामे आतापर्यंत झाली आहेत. याही पुढे उर्वरित सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आ. श्रीजया चव्हाण यांचे लक्ष आहे. त्याचाच एक भाग म्हणून कासारखेडा ते मालेगाव साडेसहा किलोमिटर अंतराच्या कामाची मंजुरी आ. श्रीयजा चव्हाण यांनी मिळवून घेतली आहे. या कामावर तब्बल 64 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
या निधीच्या माध्यमातून रस्त्याचे रुंदीकरण, नालीकरण व सिमेंट काँक्रेटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे हा रस्ता कायमस्वरुपी मजबूत होणार आहे. या रस्त्याच्या निर्मितीनंतर नांदेड ते मालेगाव हा रस्ता वाहतुकीसाठी अधिक गतिमान होणार आहे. हा निधी मंजूर करून घेतल्याबद्दल मालेगाव परिसरात आनंद व्यक्त होत आहे. या भागातील नागरिकांनी आ. श्रीजयाताई चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

COMMENTS