नांदेड दि. 23 - सोपे लिहिणे ही अतिशय अवघड गोष्ट असते. बालसाहित्य म्हणजे घडीभराची करमणूक नसून बालकांच्या आनंदी आयुष्याची पायाभरणी असते, असे प...
नांदेड दि. 23 -
सोपे लिहिणे ही अतिशय अवघड गोष्ट असते. बालसाहित्य म्हणजे घडीभराची करमणूक नसून बालकांच्या आनंदी आयुष्याची पायाभरणी असते, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी केले.
बालाजी भागानगरे लिखित ’गाऊ मजेत गाणे’ ह्या मिहाना पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशनासाठी सिद्ध केलेल्या बालकवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा डॉ. सुरेश सावंत आणि केंब्रिज हायस्कूलच्या प्राचार्या श्रीमती रेवती गव्हाणे यांच्या हस्ते सायन्स कॉलेज येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे हे होते.
डॉ. सुरेश सावंत पुढे म्हणाले, की बालकविता म्हणजे निरागस, निखळ, निर्मळ आणि निष्पाप मनाने बालकुमारांशी साधलेला संवाद असतो. बालाजी भागानगरे यांना हा संवाद छान जमला आहे. बालसाहित्य लिहिताना मनोरंजन, ज्ञान आणि मूल्यसंस्कार या गोष्टींचा ताल आणि तोल सांभाळता आला पाहिजे. बालाजी भागानगरे यांची बालकविता आनंददायी जगण्याचा मूलमंत्र देते. भागानगरे यांचा ’गाऊ मजेत गाणे’ हा बालकवितासंग्रह इतका छान झाला आहे की, यात त्यांनी शब्दचमत्कृती आणि अर्थसमृद्धी यांचा सुंदर मेळ साधला आहे.
श्रीमती रेवती गव्हाणे म्हणाल्या, की बालसाहित्यातून जीवनमूल्ये शिकविली जातात, ज्याची सद्यस्थितीत अत्यंत आवश्यकता आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ. लक्ष्मण शिंदे यांनी ’गाऊ मजेत गाणे’ या बालकवितासंग्रहातील काही ओळी वाचून दाखवल्या आणि बालाजी भागानगरे यांना पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. डॉ. धाराशिव शिराळे यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले. स. ना. जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास नांदेड येथील नामवंत साहित्यिक, रसिक आणि बालाजी भागानगरे यांचे मित्रमंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

COMMENTS