नांदेड जिल्ह्यात खासगी सावकारीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आह...
नांदेड जिल्ह्यात खासगी सावकारीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना अवाजवी व्याज, दंडात्मक रक्कम आणि चक्रवाढ व्याजाच्या नावाखाली आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप होत आहे. खासगी सावकारीच्या या प्रश्नाकडे जिल्हा प्रशासन. पोलीस अधीक्षक. एलसीबी. जिल्हा उपनिबंधक यांची संयुक्त टीम तयार करण्याची आवश्यकता असल्याचे ठाकरे सेनेचे मुख्य महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी केले.
नांदेडमध्ये एका शेतकऱ्याचे अपहरण करून खासगी सावकाराच्या कार्यालयात त्याची हत्या करण्यात आल्याची आणि त्यानंतर या घटनेला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपांची सखोल, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य महानगरप्रमुख प्रकाश मारावार यांनी केली आहे.
दहा हजारांचे कर्ज ७० हजारांवर कसे पोहोचते?
केवळ १० हजार रुपये ३० टक्के व्याजदराने घेतल्यानंतर वेळेत हप्ते भरता न आल्यामुळे संबंधित शेतकऱ्यावर ७० हजार रुपयांची परतफेड करण्याची वेळ आल्याचा आरोप करण्यात येत आहे. अल्प रकमेच्या कर्जासाठी अवाजवी व्याज, दंड आणि इतर आकारण्यांच्या माध्यमातून कर्जाची रक्कम अनेक पटींनी वाढत असेल, तर अशा व्यवहारांची कायदेशीर तपासणी होणे आवश्यक आहे.
कर्जाची गरज असलेल्या शेतकऱ्याला मदतीऐवजी कर्जाच्या दुष्टचक्रात ढकलले जात असेल, तर ही बाब गंभीर आहे. अशा घटनांची गांभीर्याने नोंद घेऊन संबंधित व्यक्तीवर कठोर व आर्थिक दंडात्मक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
सावकारीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी नोकरदारांनी तात्काळ जिल्हा प्रशासनला अथवा ठाकरे सेना मदती कक्ष संपर्क करण्याचे आवाहन ठाकरे सेनेचे मुख्य महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी केले आहे.

COMMENTS