नांदेड, २४ ऑक्टोबर २०२६: ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र’ या शासनाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन, न...
नांदेड, २४ ऑक्टोबर २०२६:
‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र’ या शासनाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन, नांदेड परिमंडळ ०२ द्वारे नांदेड जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. देगलूर तालुक्यातील एम.आय.डीसी. खानापूर येथील ‘मे. उमेश अग्रो इंडस्ट्रीज’ या ऑईल रिपॅकिंग युनिटवर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी धाड टाकून भेसळीच्या संशयावरून मोठा साठा जप्त केला आहे.
कारवाईची ठळक वैशिष्ट्ये:
जप्त केलेले उत्पादन: १,५२८ किलो रिफाइंड सोयाबीन ऑईल (वारुणी गोल्ड ब्रँड).
अंदाजे किंमत: ३,०५,६८०/- रुपये.
परवाना निलंबन: तपासणीदरम्यान आस्थापनेत स्वतःची प्रयोगशाळा नसल्याचे उघडकीस आले तसेच इतर गंभीर त्रुटी आढळल्यामुळे संबंधित आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.
कारवाई करणारे अधिकारी:
ही धडक कारवाई छत्रपती संभाजीनगरचे सह आयुक्त (अन्न) श्री. करकाळे साहेब यांच्या निर्देशानुसार आणि नांदेड परिमंडळ ०२ चे सहायक आयुक्त (अन्न) श्री. भरकड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, नांदेड-०६ चे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. व्ही. एस. लोंढे यांनी पार पाडली.
अन्न व औषध प्रशासनाकडून नागरिकांना नेहमी दर्जेदार आणि सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची नियमित तपासणी व कठोर कारवाई सातत्याने केली जात असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

COMMENTS