१६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान नांदेडच्या सायन्स कॉलेजमध्ये युवक महोत्सवाचे आयोजन; उद्घाटनाला सिने अभिनेते भारत गणेशपुरे, तर समारोप व पारितोषिक व...
१६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान नांदेडच्या सायन्स कॉलेजमध्ये युवक महोत्सवाचे आयोजन; उद्घाटनाला सिने अभिनेते भारत गणेशपुरे, तर समारोप व पारितोषिक वितरण समारंभाला अभिनेते तथा सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे यांची विशेष उपस्थिती
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अनावश्यक खर्च आणि दिखाऊपणाला फाटा देत सामाजिक संवेदनशीलता व बांधिलकी जपत आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव साजरा करावा, असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘ज्ञानतीर्थ-२०२६’चे आयोजन दि. १६ ते १९ ऑक्टोबर, २०२६ या कालावधीत नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स कॉलेज, नांदेड येथे करण्यात आले आहे. या चारदिवसीय महोत्सवात विद्यापीठ परिक्षेत्रातील ११० महाविद्यालयांमधील सुमारे ११०० विद्यार्थी विविध ३० कलाप्रकारांत आपल्या कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत.
नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा युवक महोत्सव साधेपणाने आणि काटकसरीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महोत्सवाच्या आयोजनात कोणताही अनावश्यक झगमगाट करू नये, तसेच मान्यवरांच्या स्वागतासाठी शाल, पुष्पगुच्छ आदींवर होणारा खर्च टाळावा, अशा स्पष्ट सूचना कुलगुरू डॉ. चासकर यांनी दिल्या आहेत. याशिवाय, स्थानिक परीक्षक आणि सहाय्यकांनी त्यांना मिळणाऱ्या मानधनातील काही रक्कम स्वेच्छेने परत करून सामाजिक बांधिलकीच्या या उपक्रमात योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच समाजाप्रती असलेली जबाबदारी जपण्याचा संदेश या महोत्सवातून दिला जाणार आहे.
‘ज्ञानतीर्थ-२०२६’ युवक महोत्सवाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि.१६ ऑक्टोबर, २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सायन्स कॉलेज परिसरातील साने गुरुजी मुख्य मंचावर आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाचे उद्घाटन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर राहणार आहेत.
समारंभाचे स्वागताध्यक्ष म्हणून नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सी.ए. डॉ. प्रवीण पाटील उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते भारत गणेशपुरे, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नरेंद्रदादा चव्हाण आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव अॅड. प्रदीप नागपूरकर यांची उपस्थिती लाभणार आहे.
चार दिवस चालणाऱ्या या कलामहोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ सोमवार, दि.१९ ऑक्टोबर, २०२६ रोजी सकाळी ११ वाजता साने गुरुजी मुख्य मंचावर आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मनोहर चासकर राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेते तथा सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे, नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन आणि विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन उपस्थित राहणार आहेत.
यावेळी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. प्रफुल्ल अग्रवाल आणि सचिव सौ. शामल पत्की यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विविध कलाप्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी कलावंतांचा या समारंभात गौरव करण्यात येणार आहे.
युवक महोत्सवाच्या मुख्य परिसराला ‘महात्मा ज्योतिबा फुले नगरी’ असे नाव देण्यात आले आहे. विविध कलाक्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी महोत्सवातील मंचांनाही नामवंत व्यक्तिमत्त्वांची नावे देण्यात आली आहेत.
मुख्य मंचाला ‘साने गुरुजी’, मंच क्रमांक दोनला ‘नाना पाटेकर’, मंच क्रमांक तीनला ‘डॉ. श्रीराम लागू’, मंच क्रमांक चारला ‘पंकज उधास’, तर मंच क्रमांक पाचला ‘स्मिता पाटील’ यांची नावे देण्यात आली आहेत. या पाच मंचांवर चार दिवस विविध कलाप्रकारांचे सादरीकरण होणार असून, महाविद्यालयीन युवक-युवतींच्या कलागुणांचा रंगतदार आविष्कार अनुभवायला मिळणार आहे.
या महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य, वाङ्मय, ललित कला आणि महाराष्ट्राच्या लोककलांशी संबंधित एकूण ३० कलाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. शास्त्रीय गायन, शास्त्रीय वाद्यवादन, सुगम संगीत, समूहगायन, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, एकांकिका, मूक अभिनय, वादविवाद, वक्तृत्व, कथाकथन, चित्रकला, कोलाज, पोस्टर मेकिंग, रांगोळी, छायाचित्रण, मेहंदी आणि मातीकाम यांसारख्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडविणारे पोवाडा, लावणी, लोकसंगीत आणि प्रबोधनात्मक जलसा यांसारखे कलाप्रकारही महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहेत. पारंपरिक आणि आधुनिक कलांचा संगम साधणाऱ्या या महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, अभिव्यक्तीला आणि कलात्मक क्षमतेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
यंदाच्या युवक महोत्सवातील वक्तृत्व स्पर्धेसाठी सामाजिक, पर्यावरणीय आणि तंत्रज्ञानविषयक प्रश्नांशी निगडित चार विषय निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये ‘युद्ध नको, बुद्ध हवा’, ‘अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि युवापिढीसमोरील आव्हाने’, ‘हवामान बदल : मानवी अस्तित्वासमोरील नवे आव्हान’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : मानवी अस्तित्वावरील विळखा’ या विषयांचा समावेश आहे.
या विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वर्तमानातील महत्त्वाच्या प्रश्नांवर आपली मते मांडण्याची, चिकित्सक विचार करण्याची आणि सामाजिक प्रश्नांविषयी जागरूकता निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.
‘ज्ञानतीर्थ-२०२६’ युवक महोत्सवात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील ११० महाविद्यालयांमधील सुमारे ११०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या विद्यार्थ्यांसमवेत २५८ संघ व्यवस्थापक आणि विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणासाठी साथसंगत करणारे २१० कलावंतही महोत्सवात सहभागी होणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित करणे, संघभावना वृद्धिंगत करणे आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करणे, हा या युवक महोत्सवाच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे. कला, संस्कृती, सर्जनशीलता आणि सामाजिक जाणीव यांचा संगम घडविणारा हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
‘ज्ञानतीर्थ-२०२६’ युवक महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात मंगळवार, दि.१३ ऑक्टोबर, २०२६ रोजी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स कॉलेज येथील स्वामी रामानंद तीर्थ स्मारक सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत महोत्सवाचे स्वरूप, विविध स्पर्धा, सहभागी महाविद्यालये, विद्यार्थी संख्या, उद्घाटन व समारोप समारंभ तसेच आयोजनाच्या तयारीविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. एल. पी. शिंदे आणि विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून अनावश्यक खर्चाला फाटा देत, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश देणारा ‘ज्ञानतीर्थ-२०२६’ युवक महोत्सव यंदा काटकसर, संवेदनशीलता आणि सांस्कृतिक समृद्धीचा आदर्श निर्माण करणार आहे.
चौकट:
युवक महोत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा आणि सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देणारा ‘ज्ञानतीर्थ-२०२६’ युवक महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, तसेच विद्यार्थी, प्राध्यापक आणि कलारसिकांनी महोत्सवातील विविध कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन महोत्सवाचे निमंत्रक तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर आणि युवक महोत्सवाचे सचिव डॉ. प्रशांत सुतकर यांनी केले आहे.

.jpeg)
COMMENTS