परभणी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, परभणी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी तसेच परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा २०२६-२७ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दि. ३ ते ५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल, परभणी येथे संपन्न झाली.
१७ मुले गटात छत्रपती संभाजीनगर तर मुली गटात पुणे विभागाने बाजी मारली.
१७ वर्ष मुले गटात : अंतिम फेरीत अमरावती वि छत्रपती संभाजीनगर दरम्यान अतितटी सामना होऊन ३-२ सेट मध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाने सुवर्ण पदक , अमरावती विभाग : रौप्यपदक, पुणे : कांस्य पदक प्राप्त केले .
१७ वर्ष मुली गटात :-अंतिम समना पुणे वि लातूर दरम्यान ३-१ सेट मध्ये पुणे विभाग : सुवर्ण पदक, लातूर विभाग: रौप्यपदक, कोल्हापुर विभाग : कांस्य पदक विजेता ठरल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी कल्याण पोले, प्रमुख पाहुणे गणेश माळवे (टेबल टेनिस राज्य कार्यकारिणी सदस्य) डॉ. रामेश्वर नाईक, डॉ. कौस्तुभ परताणी, सुशील कुमार देशमुख, प्रिया दिलीपसिंग ठाकूर,(प्राचार्य तथा अध्यक्ष लाईन्स क्ल्ब ऑफ फँमिली ) ज्ञानेश्वर पंडीत (जिल्हा सहसचिव) क्रीडा अधिकारी सुयश नाटकर उपस्थिती होती.
स्पर्धेचे आयोजन यशस्वी करण्यासाठी परिश्रम राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुढे, क्रीड़ा अधिकारी रोहन औढेकर, चेतन मुक्तावर,गजानन तुडमे,भागवत दुधारे,धीरज नाईकवाडे, प्रकाश पंडित इरफान सौदागर, सुमेध शिंदे योगेश आदमे, आशिष परदेशी, सचिन, इत्यादीनी परिश्रम घेतले.
पंच प्रमुख मधूकर लोणारे, राज्य पंच संतोष आचरेकर ,चिंतामणी इंगळे,हर्ष कांबळे,विकास दुर्ग,विश्वनाथ स्वामी ,गौरव पत्तेवार ,पवन देशमुख,निखिल गवळी,सुमित कुलदीपके,मनोज निकाळजे,श्लोक तगारी,युवराज सवणे,सिद्धेश बुलबुले, श्री पांगरकर ,साक्षी देवकते ,तुषार जाधव ,विवेक घुगे,विक्रम हातेकर , सिद्धेश दाभाडे यांनी काम पाहिले.

COMMENTS