परभणी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, परभणी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी तसेच परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा २०२६-२७ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दि. ३ ते ५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल, परभणी येथे होत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गणेश माळवे (टेबल टेनिस राज्य कार्यकारिणी सदस्य)
स्पर्धेच्या उद्घाटक डॉ. प्रा. माधव शेजूळ, (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त)प्रमुख पाहुणे मंगल पांडे (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त)श्रीमती प्रिया दिलीपसिंग ठाकूर,(प्राचर्य तथा अध्यक्ष लाईन्स क्ल्ब ऑफ फँमिली )उपस्थित होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. कल्याण पोले , मधुकर क्षीरसागर, निवड समिती सदस्य सचिन पुरी, अजय कांबळे, अँड .राजकुमार भांबळे, क्रीड़ाअधिकारी सुयश नाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात गणेश माळवे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, “या स्पर्धेत विजय मिळवणे महत्त्वाचे आहेच; परंतु त्यापेक्षाही महत्त्वाचे आहे प्रामाणिकपणे खेळणे, शिस्त पाळणे आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याचा सन्मान करणे. विजय मिळाला तर नम्र राहा आणि पराभव झाला तर त्यातून शिकून पुढील सामन्यासाठी अधिक जोमाने तयारी करा.”
“जिंकताना नम्र राहा आणि हरताना खचू नका,” हा खेळाचा संदेश प्रत्येक खेळाडूने आत्मसात करावा, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या खेळाडूंनी केवळ पदकासाठी नव्हे, तर आपल्या शाळेचे, जिल्ह्याचे आणि पालकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानात उतरावे, असेही त्यांनी सांगितले.
उद्घाटन पर बोलताना डॉ. माधव शेजुळ म्हणाले या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंमध्ये शिस्त, आत्मविश्वास, खिलाडूवृत्ती आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होईल. टेबल टेनिससारख्या वेगवान खेळातून महाराष्ट्राला भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवंत खेळाडू मिळतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.परभणी जिल्हा ने टेबल टेनिस खेळात नावलौकीत वाढला आहे.स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक व पंचांचे स्वागत करून स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस असोसिएशन वतीने आंतरराष्टीय टेबल टेनिस खेळाडू आद्या महेश बाहेती हिस रोख १०,०००/- रू देऊन गौरव करण्यात आला.
स्पर्धेचे आयोजन यशस्वी करण्यासाठी परिश्रम राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुढे, क्रीड़ा अधिकारी रोहन औढेकर, नागेश कान्हेकर, डी.डी. सोन्नेकर , किशोर ढोके , चेतन मुक्तावर,गजानन तुडमे,भागवत दुधारे,धीरज नाईकवाडे, प्रकाश पंडित इरफान सौदागर, सुमेध शिंदे योगेश आदमे, आशिष परदेशी, सचिन, इत्यादीनी परिश्रम घेतले.
१७ वर्ष मुले गटात : उपांत्य फेरीत पुणे वि नागपूर, तर नासिक वि अमरावती विभाग दाखल झाले
१७ वर्ष मुली :- मुंबई वि नागपूर तर पुणे वि कोल्हापुर विभाग दाखल
पंच प्रमुख मधूकर लोणारे

COMMENTS