नरेंद्र येरावार
उमरी
उमरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा शकुंतला मुदिराज व उपाध्यक्ष कैलास देशमुख गोरठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याधिकारी श्रीमती सोनाली बसवाल यांच्या नियंत्रणात रविवारी
उमरी शहरातील भटक्या श्वानांना पकडून त्यांच्यावर लसीकरण व आवश्यक उपचार प्रक्रिया करण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत शहरातील नवीन डॉ. आंबेडकर नगर परिसर, नागझरी, व्यंकटेश नगर परिसर, सदानंद बाबा महाराज मंदिर परिसर, बाजार गल्ली, साईबाबा गल्ली तसेच डॉ.आंबेडकरनगर, पोलिस स्टेशन परिसर जुने गाव परिसरातील एकूण ३० भटक्या श्वानांना प्रशिक्षित पथकाच्या मदतीने सुरक्षितरीत्या पकडून त्यांचे लसीकरण व आवश्यक उपचार प्रक्रिया करण्यात आली.
सदर मोहिमेत नगर परिषद उमरीचे माधव जमदाडे, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता कैलास येमेलवाड, गणेश मदने वरिष्ठ लिपीक,आकाश खंदारे पाणीपुरवठा व स्वच्छता सहायक तसेच नगर परिषदेचे कर्मचारी सहभागी झाले होते.
भटक्या श्वानांपासून नागरिकांना होणारा त्रास कमी करणे, रेबीजसारख्या आजारांचा प्रसार रोखणे तसेच श्वानांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. शहरातील इतर भागांतही ही मोहीम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.
नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे...

COMMENTS