श्रीक्षेत्र माहूर
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी सदैव तत्पर असणारे आणि विकासकामांत पारदर्शकता जपण्यासाठी ओळखले जाणारे लोकप्रिय खा नागेश बापूराव पाटील आष्टीकर यांनी माहूर तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींमधील कथित गैरव्यवहारांच्या तक्रारींची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे गोंडवडसा अंजनखेड सेलू करंजी शेकापुर सिंदखेड पारडी आणि हारडफ या गावांमधील मागील ५ वर्षांतील कामांची अंदाजपत्रकांची व मोजमाप पुस्तिकांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र जा.क्र. १९८१/२०२६ द्वारे देऊन भ्रष्टाचाराला कडाडून विरोध दर्शवला आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या या धडक व धाडसी निर्णयाचे संपूर्ण तालुक्यात उत्स्फूर्त स्वागत होत आहे.
खा नागेश पाटील आष्टीकर यांनी हाती घेतलेल्या या जनहितैषी मोहिमेत प्रशासकीय स्तरावर कोणतीही कागदपत्रांची दडपादडपी होऊ नये आणि गावपातळीवरील खरी वस्तुस्थिती थेट खासदारा पर्यंत पोहोचावी, यासाठी माहूर तालुक्यातील मौजे मच्छिंद्र पारडी येथील रहिवासी व निष्ठावान नागरी सेवा अभ्यासक गौरव संजय राठोड यांनी संपूर्ण निःस्वार्थ भावनेने खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या भ्रष्टाचारमुक्त तालुक्याच्या संकल्पनेला प्रत्यक्ष बळ देण्यासाठी त्यांनी 'पायलट सेतू प्रकल्प ची संकल्पना मांडली असून, खासदार कार्यालयाला थेट ग्राउंड-ऑडिट अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपवण्याची नम्र विनंती केली आहे स्थानिक प्रशासकीय हस्तक्षेपाशिवाय गावातील कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन छायाचित्रे व व्हिडिओ पुराव्यांसह निष्पक्ष तपासणी शून्य खर्चात निःस्वार्थ सेवा या मोहिमेसाठी खासदार कार्यालय अथवा प्रशासनावर कसलाही आर्थिक भार पडणार नाही केवळ लोकसेवेच्या भावनेतून ही तांत्रिक मदत पुरवली जाईल खासदार प्रशासनावर अवलंबून न राहता थेट नागरिकांच्या साक्षीने तयार केलेले वस्तुनिष्ठ पंचनामे थेट खासदार साहेबांच्या हाती सुपूर्द केले जातील ज्यामुळे दोषींवर तात्काळ कारवाई करणे अधिक सुलभ होईल माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पारडीसारख्या ग्रामीण भागातील उच्चशिक्षित तरुणाने लोकप्रतिनिधींच्या हातात हात घालून समाजकार्यासाठी पुढे येणे ही एक सकारात्मक नागरी चळवळ मानली जात आहे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला अशा प्रामाणिक व अभ्यासू तरुणांच्या 'पायलट सेतू'ची जोड मिळाल्यास तालुक्यातील पारदर्शकता एका नव्या उंचीवर पोहोचेल


COMMENTS