धरणे सर, तुमची कादंबरी सलग सहा तासांमध्ये वाचून काढली. धोंडीबाच्या घरात १८ विश्व दारिद्र्य आणि त्यांचा होतकरू लेक खंडेराव व सून हौसा यांनी म...
धरणे सर, तुमची कादंबरी सलग सहा तासांमध्ये वाचून काढली. धोंडीबाच्या घरात १८ विश्व दारिद्र्य आणि त्यांचा होतकरू लेक खंडेराव व सून हौसा यांनी मेंढरांच्या पाठीमागे केलेली पायपीट आणि त्यांचा तो गरिबीचा प्रवास वाचकाचे मन हेलावून टाकतो. त्यांची मुले वेगवेगळ्या स्वभावाची जरी असली, तरी त्यातील एक शिरपा छान शिकून व बुद्धीच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभा राहिला. सर्जेराव बुद्धीने हुशार पण लालसेपोटी मायबापाचे न जुमानता काही व्यवहारांत पुरता फसला गेला. वेळेस आई-वडिलांचे ऐकले असते, तर ही वेळ आली नसती. पण शेवटच्या क्षणी सावरून आपल्या भावासारखी प्रगती करून सैन्यात भरती होतो आणि देशसेवा करतो. त्याची प्रेयसी चांगुणासुद्धा समाजसेवा करत राहिली, या चांगल्या कामाचे फळ त्या दोघांनाही मिळाले.
पण जेव्हा तो आपल्या घरी परत आला, तेव्हा खूप उशीर झाला होता; कारण घरात वडील नव्हते. विशेष म्हणजे सर्जेराव गेल्याची सल खंडेरावाला मरेपर्यंत सतावली. हे दुःख मात्र जास्त झाले. शेवटी सगळे चांगले झाल्यानंतर हौसा ही खंडेराव जाण्यामुळे दुःखी झाली. एकूणच या कुटुंबाची झालेली वाताहत ही 'पायपीट'च्या लेखनातून तानाजी धरणे सरांनी मांडली आहे. वाचताना खूप मनाला वेदना होतात. गरिबी, दुःख, वेदना सोबत असूनही संघर्ष, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि शिक्षण हे यशाची गमक आहेत, हे स्वतः तानाजी धरणे सर यांनी अनुभवले असून या सगळ्या गोष्टींवर त्यांनी मात केली. धन्य सर, माझा सलाम तुमच्या आईला, तुमच्या भावाला, तुमच्या लेखनाला आणि तुमच्या कर्तुत्वाला! वाचकांसाठी ही तुमची प्रेरणा आहे. तुम्ही अजून पुढे लेखन करावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

- परीक्षण: संतोष गायकवाड
- वाशिम
- कादंबरी: पायपीट
- लेखक: तानाजी धरणे
- संपर्क : 9975370912
- 7498663656
- प्रकाशन: ज्ञानसिंधु प्रकाशन, नाशिक
- पृष्ठे: १४०
- मूल्य: ₹२५०

COMMENTS