इस्लापूर येथे तासभर रस्ता रोको; हेक्टरी एक लाख नुकसानभरपाईसह पीकविम्याची मागणी किनवट : पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके कर...
इस्लापूर येथे तासभर रस्ता रोको; हेक्टरी एक लाख नुकसानभरपाईसह पीकविम्याची मागणी
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्याकिनवट तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा.
बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी.
खरीप पिकांचे सरसकट पंचनामे करून १०० टक्के पीकविमा मंजूर करावा.
वंचित शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून तातडीने नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे.
शेतीसाठी दिवसा किमान १२ तास अखंडित वीजपुरवठा करावा.
रस्ता रोकोमुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस व महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
‘मदत न दिल्यास सत्ताधाऱ्यांना फिरणे मुश्किल’
यावेळी आंदोलकांना संबोधित करताना कॉ. अर्जुन आडे म्हणाले, “निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आधीच उद्ध्वस्त झाला आहे. डोळ्यादेखत पिके जळून खाक झाली असताना शासन दुष्काळ जाहीर करण्यास विलंब का करीत आहे? पंचनाम्यांच्या कागदी घोड्यांपेक्षा शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात भरीव मदत जमा केली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. आमदार, खासदार आणि सत्ताधाऱ्यांना फिरणे मुश्किल करू,” असा इशारा त्यांनी दिला.
या आंदोलनात जनार्दन काळे, मोहन जाधव, आडेलू बोनगीर, सीताराम आडे, शेषराव ढोले, साईनाथ राठोड, विजय जाधव, रंगराव चव्हाण, ज्ञानेश्वर नाईक, शिवाजी आडे, किरवले, दिलीप जाधव, यशवंत राठोड, सुरेखा मेंढेके, मधुकर राठोड, सिनू आडे यांच्यासह परिसरातील शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
किनवट : पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके करपून गेली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर किनवट तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शनिवारी (दि. १२) इस्लापूर येथे राज्यमहामार्गावर जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अर्जुन आडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली
पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक भागांत पिके हातची गेली आहेत. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होऊ लागला आहे. शासनाचे या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी किसान सभेच्या आवाहनावर परिसरातील शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्याकिनवट तालुक्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा.

COMMENTS